लिव्हरमध्ये झालेली जमा चरबी ‘हे’ पाच घरगुती उपाय वापरून कमी करा आणि शरीर ठेवा निरोगी

लिव्हरमध्ये झालेली जमा चरबी ‘हे’ पाच घरगुती उपाय वापरून कमी करा आणि शरीर ठेवा निरोगी

आपल्या शरीरातील लिव्हर निरोगी आणि स्वच्छ असणे गरजेचे आहे. जर आपल्या लिव्हरला काही समस्या आढळून आल्या तर पर्यायीपणे याचा परिणाम आपल्या संपूर्ण शारीरिक आरोग्यवर दिसून येतो. फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये चरबी जमा होण्याची समस्या हल्ली बऱ्याच जणांना होते. त्यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु या समस्येवर योग्य आहार आणि जीवशैलीने मात करता येऊ शकते.

फॅटी लिव्हरची लक्षणे
फॅटी लिव्हरची मुख्य लक्षणे म्हणजे लिव्हरवर सूज येणे​, अशक्तपणा, कंटाळा येणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, त्वचेवर खाज सुटणे, डोळे व त्वचेचा रंग बदलणे, ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, थकवा येणे,शरीरात वेदना होणे, अचानक वजन वाढणे, खूप थकवा येणे, हातापायातील नसा जाड होणे, भूक न लागणे, वजन कमी होणे इत्यादी आहेत.

हळद (Turmeric)
हळद ही एक महत्वाची नैसर्गिक औषधी वनस्पती मानली जाते. हळद लिव्हरमध्ये जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. हळदीचा समावेश रोजच्या आहारात केल्यास आरोग्य सुधारते. हळदीत करक्यूमिन घटक असल्यामुळे लिव्हरची स्थिती सुधारण्यास मदत करतात.

ग्रीन टी (Green Tea)
ग्रीन टी मध्ये असणारे कॅटेचिन्स नावाचे घटक लिव्हरवरील ताण कमी करण्यास मदत करतात. ग्रीन टी हा अँटिऑक्सिडंट्सचे मुख्य स्रोत आहे. ग्रीन टी पिल्यास लिव्हर स्वच्छ होते आणि मजबूत होण्यास मदत होते.

फळे आणि बेरी (Fruits and Berry)
फळांमधील मुख्य फळं म्हणजे आणि स्ट्रॉबेरी ब्लू बेरी ही फळे लिव्हरची सूज कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर लिव्हरमध्ये जमा होणारी चरबी सुद्धा घालवण्यासाठी फायदेशीर असतात.

हिरव्या पालेभाज्या (Leafy Vegetables)
पालक, कोथिंबीर, मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्या लिव्हरची चरबी कमी करण्यास उपयुक्त असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स लिव्हरला मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. कमी कॅलोरीस असल्यामुळे पर्यायी वजनही नियंत्रणात राहते.

मासे (Fish)
माश्यांमध्ये असलेलं ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स लिव्हरचे कार्य अधिक सक्षम करण्यास मदत करते. तसेच जर लिव्हरची सूज असेल तर कमी करण्यास फायदेशीर ठरते.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन; Navneet Rana यांना अश्रू अनावर

काँग्रेसला गणपती पूजेची चीड, त्यांनी माझ्या पूजेलाही विरोध केला: PM Narendra Modi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version