सर्दी आणि खोखल्यावर त्रिकटू चूर्णाचे रामबाण उपाय

सर्दी आणि खोखल्यावर त्रिकटू चूर्णाचे रामबाण उपाय

थंडीत सर्दी आणि खोकला यासारखे लक्षणे लगेच दिसून येतात. तसेच उत्तर भारतात थंडी सहन करणे कठीण आहे. बरीच लोक थंडी आणि सर्दीमुळे त्रस्त झाले आहेत. थंडीमध्ये काही पदार्थाचे सेवन करावे त्यांनी शरीरात उष्णता राहते. थंडीच्या दिवसात गरम पदार्थाचे सेवन करणे. थंडीमध्ये सुंठ, पिंपळ आणि काळी मिरी यांची पावडर बनवून सेवन करणे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीरात उष्णता निर्माण होते. सर्दी झाल्यास आपल्याला कफ जास्त प्रमाणात होतो . पाणी त्याच बरोबर खोकला देखील होतो. अशावेळी थंड पदार्थ खाणे टाळणे. जर तुम्ही या चूर्णाचा नियमितपणे वापर केल्यास तुमची पचनक्रिया सुधारू शकते.

हे ही वाचा : सध्या डोळ्यांची साथ पसरत चालली आहे, तर अशी घ्या डोळ्यांची काळजी

 

त्रिकटू चूर्णाचे सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते.

अपचन आणि पोटाचे विकार कमी होतात.

जर तुम्हाला खोकला आणि जास्त प्रमाणात कफ असेल तर तुम्ही त्रिकटू चूर्णाचे सेवन करू शकता.

सायनस आणि अस्थमाच्या रुग्णांना ते खाल्ल्याने त्यांना फायदा होतो.

मूळव्याधीच्या रुग्णांनाही या चूर्णाचे सेवन केल्याने उत्तम फायदा होतो.

जर तुम्हाला सर्दी जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही या चुर्णाचा वापर देखील करू शकता.

 

त्रिकटू चूर्ण कसे बनवणे –

सुंठ, पिंपळ आणि काळी मिरी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे. यांचे प्रमाण सारखे ठेवणे. जर तुम्हाला असे वाटत असेल की यामधून कोणाचे प्रमाण जास्त झाले आहे. तर तुम्ही ते कमी देखील करू शकता. ही पावडर जेवणाच्या अगोदर गरम पाण्यात किंवा मधमध्ये मिक्सकरून खाणे.

सर्दी झाल्यास तुम्ही गरम पाण्याची वाफ देखील घेऊ शकता. किंवा गरम पाण्याचे सेवन देखील करू शकता.

हे ही वाचा :

या आजरांमुळे डोळ्यांचे आरोग्य बिगडू शकते, लक्षणे दिसल्यास ताबडतोब करून घ्या उपचार

 

Exit mobile version