सुका खोकला दूर करण्यासाठी करा रामबाण उपाय

खोकला सुका असुदे किंवा ओला तो आरोग्यासाठी खूप त्रासदायक असतो. जर तुम्हाला खोकला जास्त प्रमाणत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सुका खोकला दूर करण्यासाठी करा रामबाण उपाय

खोकला सुका असुदे किंवा ओला तो आरोग्यासाठी खूप त्रासदायक असतो. जर तुम्हाला खोकला जास्त प्रमाणत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. खोकला असल्यास त्याचा परिणाम आपल्या आतड्यांवर होतो .तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून काही रामबाण उपाय सांगणार आहोत.

बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या-मोठ्या आजारांची लागण होते. सर्दी, खोकला आणि ताप येण्याच्या तक्रारी जास्त उद्भवतात. सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक होतो . त्यामध्ये कोरडा खोकला जास्त त्रासदायक असतो.

खोकला कमी करण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. आल्याचा तुकडा बारीक वाटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या. पाच मिनिटानंतर आले बाहेर काढा आणि पाण्याने गुळण्या करा.

सुक्या खोकल्यावर मधाचे सेवन करणे हा रामबाण उपाय मानला जातो. मधामुळे घशातील खवखव कमी होते. तसंच घशामधील संसर्गही दूर होतो. एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. मध आणि पाणी नीट मिक्स झाल्यानंतर ते प्या.

गरम दुधामध्ये हळद मिक्स करा आणि ते मिश्रण प्या. हळदीमध्ये सर्दी नाही तर खोकला, अंगे दुःखी देखील कमी होते. हळदी मधी नैसर्गिक औषधी गुणधर्म आहे. त्यामुळे खोकल्यावर हळदीचे दूध हा रामबाण उपाय आहे.

सुक्या खोकल्याच प्रमाण जास्त असल्यास गूळ खाणे. किंवा कोमट गरम पाण्यात गूळ पावडर मिक्स करुन पिणे. यामुळे खोकला कमी होतो. गूळ खाल्यास पचनक्रिया देखील सुधारते.

​कोमट गरम पाण्यात मीठ मिक्स करणे आणि त्याचा गुळण्या करणे . त्यामूळे तुमच्या घाशला आराम मिळेल. आणि घशातील संसर्ग नाहीसा होतो.

गरम पाण्याची वाफ घेणे.

हे ही वाचा:

यंदाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमानिमित संघाकडून अॅड. सदवार्ते यांना प्रमुख अतिथीचं निमंत्रण

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही; रामदास आठवलेंचा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version