“सब्जा” हे शरीरासाठी गुणकारी आणि औषधही

अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरु झाला आहे.भर दुपारच्या वेळेत तर घराबाहेर पडूच नये असं वाटतं असत कारण ऊन्हाच्या झळाच इतक्या लागत असतात. याचे भौगालिक कारण सुद्धा आहे ;सूर्य पृथ्वीच्या माथ्यावर आल्याने त्याची सूर्यकिरणे हि थेट सरळ पडतात, ज्यामुळे या उष्ण आणि दमट वातावरणात आपल्याला उष्णतेचे विकार होण्याची संभवता असते.

“सब्जा” हे शरीरासाठी गुणकारी आणि औषधही

अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरु झाला आहे.भर दुपारच्या वेळेत तर घराबाहेर पडूच नये असं वाटतं असत कारण ऊन्हाच्या झळाच इतक्या लागत असतात. याचे भौगालिक कारण सुद्धा आहे ;सूर्य पृथ्वीच्या माथ्यावर आल्याने त्याची सूर्यकिरणे हि थेट सरळ पडतात, ज्यामुळे या उष्ण आणि दमट वातावरणात आपल्याला उष्णतेचे विकार होण्याची संभवता असते. तर हे उष्णतेचे विकार काय काय होऊ शकतात , तर ऊन बाधने, मूत्रविसर्जन करताना दाह किंवा वेदना होणे, अंगावर पित्त उठणे, तोंड येणे, त्वचेवर उष्णतेच्या चटया येणे, नाकातून रक्त पडणे वगैरे वगैरे तर यावर घरगुती उपाय म्हणून उन्हाळ्यामध्ये सब्ज्जा चा वापर आपण करू शकतो परंतु या सब्ज्जाचे काय फायदे आहेत

त्यातही ज्यांना उन्हाचा प्रत्यक्ष सामना करावा लागतो अशा मंडळींना, ज्यांना ऊन बाधते, अशा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना आणि कडक उन्हाळा असूनही उष्ण गुणांचा आहार घेणार्‍यांना उन्हाळा फार बाधतो. त्यामुळे विविध उष्णताजन्य तक्रारी या दिवसांमध्ये त्रस्त करतात. या सर्व तक्रारींना प्रतिबंध म्हणून आणि तक्रारी फार गंभीर नसताना घरच्याघरी करण्याजोगा सुरक्षित उपचार म्हणजे ’सब्जा’.सब्जा हे तुळशीसारखेच एक लहानसे क्षुप असते, जे सर्वत्र उगवते. त्यातही पंजाब राज्यामध्ये सब्जाची रोपटी अधिक पाहायला मिळतात. या सब्जाच्या झाडाचे बी हे तुळशीच्या बीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचे व काळसर-करड्या रंगाचे असते. हे बी पाण्यामध्ये भिजवल्यावर ते फुगते व पाणी शोषून पांढरट रंगाचे व बुळबुळीत बनते. भिजून फुगल्यानंतर हे बी पाण्यामधून, दुधातून वा सरबतातून घेतल्यास ते उष्णताजन्य वरील विकारांवर अतिशय गुणकारी ठरते.सब्जाचे बी हे चवीला गोड असून शरीरातला थंडावा वाढवून ऊष्मा कमी करण्याचा अलौकिक गुण त्यांमध्ये आहे. सब्जा बीमुळे मूत्र सहज सुटते व मूत्रविसर्जन करताना होणारा दाह व वेदना दूर होते. या दिवसांमध्ये काही जणांना वारंवार मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचा (युरिन इन्फेक्शनचा) त्रास होतो. अशा लोकांनी सब्जाचे बी सकाळ-सायंकाळ घेतल्यास चांगला आराम पडतो.

विशेष म्हणजे वरील आजार झाल्यानंतर बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांचे आहारामध्ये सब्जाचे सेवन करण्याचं प्रमाण वाढू लागलंय. सब्जाच्या बिया आपल्या शरीरासाठी (Health Care Tips) लाभदायक असतात आणि योग्य प्रमाणात सब्जा खाल्ल्यास आरोग्य निरोगी राहण्यासही मदत मिळते. सब्जामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, मॅगनिज, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस हे घटक भरपूर प्रमाणात असतात. आपल्या डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सब्जाच्या बियांचा समावेश केला जाऊ शकतो. औषध घेतात, तसे न घेता त्या तक्रारी होऊच नयेत म्हणून घेण्यासारखे सब्जा हे सुरक्षित औषध आहे. सब्जाचा शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्याचा गुण तर इतका प्रभावी आहे की, दिवसातून तीन-चार वेळा सब्जा घेतल्यास शरीरामध्ये एसी ठेवल्यासारखा परिणाम होतो. या तळपत्या उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे येणार्‍या पाहुण्याचे स्वागत सब्जा बी देऊनच केले पाहिजे…म्हणजे येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाला सरबतही मिळेल आणि औषधही. 

हे ही वाचा : 

२४ तासात ठाण्यातील एक तरी पोलीस अधिकारी बदलून…, गृहमंत्र्यांना जयंत पाटलांचे आव्हान

वानखेडेवर उभारणार विजयी षट्काराचे विजय मेमोरियल

IPL 2023 DC Vs GT, आज येणार दिल्ली आणि गुजरात आमने सामने, पांड्या विजयाचा पॅटर्न कायम ठेवणार?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version