spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sharad Purnima 2022: आयुर्वेदानुसार शरद पौर्णिमेला चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर ठरू शकते आयोग्यासाठी उपयोगी, जाणून घ्या कशी?

एवढेच नाही तर चंद्राच्या या प्रकाशाशी संबंधित काही फायदे आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही विविध प्रकारच्या आजारांपासून मुक्त होऊ शकता.

वर्षभरातील पौर्णिमांपैकी शरद पौर्णिमेला खूप महत्त्व असते. यादिवशी खास खीर तयार करून मग ती खीर रात्रभर घराबाहेर, गच्चीवर किंवा गॅलरीत ठेवली जाते. रात्री चंद्राची किरणे थेट खीरच्या भांड्यात पडतात. हे भांडे प्लेटऐवजी पातळ कापडाने झाकलेले असते. त्यामुळे किरणांचा परिणाम दूध आणि तांदळावर होतो.

पूर्वीपासून प्रचलित असणाऱ्या कथांनुसा शरद पौर्णिमेच्यादिवशी चंद्र खीरीमध्ये विरघळतो आणि त्यामुळे आपल्याला अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. पण या कथेकडे आयुर्वेदाच्या दृष्टीतून पाहिलं तर शरद पौर्णिमेच्या खीरीमध्ये चंद्राचा प्रकाश खरोखरच अशा घटकांना विरघळतो, ज्यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजारांपासून आराम मिळतो. एवढेच नाही तर चंद्राच्या या प्रकाशाशी संबंधित काही फायदे आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही विविध प्रकारच्या आजारांपासून मुक्त होऊ शकता.

शरद पौर्णिमेच्या खीरीचे फायदे:

  • शरद पौर्णिमेला दूध, तांदूळ आणि साखर मिसळून खीर बनवली जाते.
  • ही खीर रात्रभर चंद्राच्या प्रकाशात बाहेर ठेवली जाते.
  • आयुर्वेदाच्या मते या दिवशी चंद्राची किरणे इतकी थंड असतात की त्याचा प्रभाव खीरीच्या प्रभावालाही थंडावा देतात.
  • ही खीर खाल्ल्याने पित्ताशी संबंधित समस्या कमी होतात.
  • ही खीर आम्लपित्त, त्वचेवर पुरळ, पोटात जळजळ, अर्टिकेरिया यांसारख्या आजारांपासून आराम देते.
  • जे लोक कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात बसावे. शरद पौर्णिमेच्या चंद्राची किरणे त्वचेचे आजार बरे करण्यास मदत करतात.
  • डोळ्यांना जर वारंवार इन्फेक्शन होत असेल, शरद पौर्णिमेच्या चंद्राकडे पहावे. हि कृती तुम्हाला सतत पाच ते दहा मिनिटे करावे लागेल. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राकडे पाच मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ सतत पाहत राहिल्याने चंद्राच्या किरणांमुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि रोगाचा प्रभाव कमी होतो.
  • याशिवाय यूटीआय म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यास औषधी मिश्री आणि कोथिंबीर मिसळून खाल्ल्यास आराम मिळेल. त्यामुळे छातीत जळजळ होत असल्यास, अस्वस्थता, उलट्या, यांपासून शरद पौर्णिमेच्या दिवशी बाहेर ठेवलेली मिश्री खाल्ल्याने आराम मिळतो.
  • यंदा ही खीर ९ ऑक्टोबरला बनवून रात्री चंद्रासमोर ठेवली जाईल.

हे ही वाचा:

Valmiki Jayanti 2022: आज महर्षि वाल्मिकी जयंती, जाणून घ्या खास गोष्टी…

Sharad Purnima 2022: शरद पौर्णिमेनिमित्त जाणून घ्या कोजागिरी पूजेचे महत्त्व

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss