ऑनलाईन शॉपिंग करताय ? तर या टिप्स नक्की फॉलो करा

ऑनलाईन शॉपिंग करताय ? तर या टिप्स नक्की फॉलो करा

शॉपिंग करायला सर्वांना आवडते . काहीजणांना शॉपिंग इतकी आवडते की ते सतत शॉपिंग करत असतात . शॉपिंग केल्याने मन आनंदी होते . काहीजणांना कपड्याची शॉपिंग करायला आवडते तर काहीजणांना फूटवेअर , अ‍ॅक्सेसरीजची शॉपिंग करायला आवडते . आजकाल ऑनलाईन शॉप्पिंगचा ट्रेंड चालू आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये खूप विविधता पाहायला मिळते . पण ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे . आपण ऑनलाईन शॉपिंगमध्ये घरी बसून आपल्या आवडत्या वस्तूची ऑर्डर करू शकतो . तसेच सणासुदीच्या सिझनमध्ये आपल्याला भरपूर डिस्काउंट, ऑफर्स, कॅशबॅक वैगेरे मिळतात . पण आपण उत्साहामध्ये खरेदी करतो पण आपण बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतो . आपला पैसा वाया जातो . ऑनलाईन शॉपिंग बद्दल आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

हे ही वाचा : चेहरा गोरा पण मान काळपट तर करा हे उपाय

 

अनेक वेळा लोक स्वस्त वस्तू पाहून अनोळखी साइटवर खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. बहुतेक साइट सुरक्षित नाहीत. येथे खरेदी केल्याने तुमचे खाते हॅक होण्याची शक्यता असते आणि तुम्ही सायबर फसवणुकीचे बळी देखीलहोऊ शकता . म्हणून ऑनलाईन शॉपिंग करताना साइट बद्दल सर्वी खात्री करून घेणे आणि मग शॉपिंग करणे .

काही लोक नकळत ऑनलाइन खरेदी करताना https आणि http मधील फरक लक्षात घेण्यास विसरतात. जरी https साइटवर ‘S’ सुरक्षा चिन्ह आहे. अशा परिस्थितीत http साइटऐवजी https साइटवरून खरेदी करा. खरेदी करताना दुकानदाराचा पत्ता, फोन नंबर आणि ईमेल पत्ता तपासून घ्या .

 

तुम्ही ऑनलाइन खरेदीसाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, दर तीन महिन्यांनी तुमचा पिन क्रमांक बदलायला हवा. डिजिटल वॉलेटसाठीही हेच करावे. याशिवाय वेगवेगळे यूजर आयडी वापरा. यामुळे डेटा चोरी आणि फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.

ऑनलाइन वस्तू घेताना, अटी नीट वाचून घ्या आणि ते वाचायला विसरू नका . बर्‍याच वेळा, मर्यादित ऑफर पाहून, ग्राहक घाईत वस्तू खरेदी करतात आणि अटी वाचत नाही त्यामुळे त्या वस्तू परत घेतल्या जात नाही त्यासाठी खरेदी करताना सर्व गोष्टी नीट तपासून आणि वाचून घेणे .

ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत तुमची ऑर्डर डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच पॅकेट उघडून ते तपासून घ्या जर तुम्हाला काही फॉल्ट आढळल्यास डिलिव्हरी बॉयसोबत फोटो घ्या. हे तुम्हाला तक्रारी दाखल करण्यात आणि पैशांचा दावा करण्यात मदत करेल.

हे ही वाचा : 

थायरॉईड नियंत्रणात आण्यासाठी घरगुती उपाय

 

Exit mobile version