spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रात्री झोपताना केस मोकळे ठेवायचे कि नाही ?

स्त्रियांचे रूप हे त्याच्या केसांमुळे खुलून येत. तसेच केस लांबलचक असतील तर, दिवसभर त्यांची निगा राखण्यात भरपूर वेळ स्त्रिया घालवत असतात.

मुंबई :- स्त्रियांचे रूप हे त्याच्या केसांमुळे खुलून येत. तसेच केस लांबलचक असतील तर, दिवसभर त्यांची निगा राखण्यात भरपूर वेळ स्त्रिया घालवत असतात. पण, रात्री झोपताना काय करायचं ? असा प्रश्न मात्र सर्वांनाच अनेकदा पडत असतो. केस मोकळे सोडले तर केसांचा गुंता होतो, आणि तो सोडवताना केस तुटतात. तर केस बांधून ठेवले तर केसगळती वाढणार असा अनुभव सर्व महिलांना आला असेल… पण, यावर उपाय म्हणजे तुमचे केस कसे आहेत तसेच झोपताना ते कसे बांधावे हे अवलंबून आहे. केसाची काळजी कश्याप्रकारे घ्यावी हे जाणून घ्या…

  • बऱ्याच स्त्रियांची अशी अपेक्षा असते की, सकाळी उठल्यावर केस मऊ आणि रेशमी असावेत. यासाठी रात्री झोपण्याअगोदर केसांना चांगला हेअरमास्क लावा. नंतर कॅप घाला आणि सकाळी उठल्यावर केस धुवा. केस नेहमीपेक्षा जास्त मऊ होतील.
  • ज्यांना कुरळ्या केसांची आवड आहे, त्यांनी रात्री केस बांधून झोपावे. केस आणि केसातील कुरळेपणा सकाळी उठल्यावरदेखील चांगल्या अवस्थेत राहतील. याकरिता केसांचा आंबाडा किंवा पोनीटेल बांधून झोपावे.
  • रात्रीच्या वेळी केस कोरडे आणि नाजूक बनतात, कारण डोक्याखाली घेतलेली उशी, केसातील ओलावा यामुळे तेल शोषून घेतले जाते. सकाळी कंगवा करताना केस नाजूक झाल्यामुळे तुटतात. त्यामुळे रात्री झोपताना केस बांधून झोपणे किंवा स्कार्फ बांधून झोपणे आवश्यक आहे.
  • केस सुंदर राहण्यासाठी उशीला सिल्कचे अभ्रे, सुती अभ्रे वापरा. कॉटन पिलो कव्हर वापरल्यामुळे केस कोरडे होऊन तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या सुरक्षेसाठी रेशमी अभ्रे वापरू शकता. यामुळे केस तुटण्याचा आणि गुंता होण्याचा धोका कमी असतो.
  • ओले केस बांधून कधीही झोपू नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता वाढते. परंतू केसांमधील गुंतागुंत कमी करण्यासाठी तुम्हांला ते बांधून ठेवणे गरजेचे वाटत असेल तर ते सुकल्यानंतरच बांधा. यामुळे ते तुटण्यापासून बचावतील. हाच नियम ब्लो ड्रायसाठीदेखील लागू होतो. शक्य असेल तर नैसर्गिकरित्याच सुकवण्याचा प्रयत्न करा.
  • केस कुरळे असतील तर त्याचा आंबाडा बांधा किंवा एका बाजूला सैल बांधून ठेवा. यामुळे तुमची झोपमोड होणार नाही.
  • केस मोकळे आणि सरळ असतील तर रात्रीच्या वेळेस तुम्ही सैलसर पोनी बांधून ठेऊ शकता. यामुळे केसांमध्ये गुंता होणार नाही. व ते सकाळी फ्रिझी होत नाहीत. सैलसर वेणी बांधून ठेवल्यास केसांमध्ये गुंता होणार नाही. तसेच त्यांना नॅचरल टॅंग्स मिळतील.
  • केस लांब असतील ते बांधून ठेवणे सोयीस्कर ठरते. मात्र जास्त वेळ व घट्ट बांधून ठेऊ नका. यामुळे केस तुटू शकतात.
  • केसांच्या प्रकारानुसार त्यांची योग्य काळजी घ्यायला हवी. अगदी छोटे केस असतील तर ते रात्री झोपताना बांधून ठेवण्याची गरज नाही. परंतु लांब केस असतील ते मोकळे सोडून झोपणे योग्य नाही.

हे ही वाचा :-

जाणून घ्या… आपल्या शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या टोमॅटोचे फायदे 

 

Latest Posts

Don't Miss