पावसाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

पावसाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी
ऋतुमानानुसार त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या जाणवतात. त्वचेवर पावसाचे पाणी पडल्यावर टॅनिंग, खाज, फ़ंगल, फोडे, त्वचा लाल होणे, त्वचेवर दुर्गंधी येणे अशा अनेक त्वचेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी त्वचेची योग्य ती काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. तर आज आपण या लेखात पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घेणार आहोत हे आज जाणून घेणार आहोत. तर जाणून घेऊयात काही टिप्स.
काळजी कशी घ्यायची ?
पावसाळ्यात घाम आणि प्रदूषणामुळे त्वचेवर धूळ जमते. तुम्हाला सौम्य फेसवॉशने चेहरा धुवावा लागेल. या सवयीमुळे चेहऱ्यावर साचलेली धूळ निघून जाईल. त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. पावसाळ्यात भरपूर पाणी प्या. तसेच बाहरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त पालेभाज्याचा समावेश करा. यामुळे पावसाळ्यातही आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. हर्बल टोनरचा नियमित वापर केल्याने त्वचेची चमक कायम राहते. सर्वसाधारणपणे टोनर चेहरा ताजे ठेवतो. पावसाळ्यात त्वचा तेलकट होते. अशावेळी टोनरच्या वापराने चेहऱ्यावर तेल साचणे टाळता येते. केशर आणि गुलाबाचा अर्क मिसळून टोनर वापरणे चांगले.
आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी, लिंबू आणि टोमॅटोचे स्क्रब लावा. यामुळे आपली त्वचा निरोगी आणि ताजी दिसेल. आठवड्यातून 2 ते 3 दिवस हे करायला पाहिजे. पावसाळ्यात शक्यतो फळे आणि भाज्या जास्त खा आणि दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे आपला चेहरा ग्लो करेल.
Exit mobile version