spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महिलांसाठी उपयोगी असलेले काही खास योगासने

योगासने हा आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे. रोज योगासने केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तसेच आजकाल महिल्यांच्या वाढत्या वयाबरोबरच त्यांच्या शरीरामध्ये देखील वेगवेगळे बदल होतात. धावपळीमुळे महिला शरीराकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे शरीर अनेक आजारांना निमंत्रण देतात. शरीराला सुदृढ आणि सक्षम ठेवण्यासाठी योगाची आवश्यकता आहे. महिलांच्या आरोग्यासाठी आणि फिट राहण्यासाठी आज आम्ही तुम्हाला या योगासनांबद्दल सांगणार आहोत.

योगासने –

बालकासन –

बालकासन आपल्याला शांती देते. आपल्या मेंदूला शांत ठेवण्याचे आश्वासन देते. आपल्या शरीरातील
हार्मोन्समध्ये खूप बदल घडून येतात अशा वेळी हे आसन शरीरातील स्थितीला स्थिरता प्रदान करते.

उत्कटासन –

उत्कटासन केल्याने कंबर आणि मांडीला आराम मिळतो. तसेच पाय, खांदे, हात यांना देखील आराम मिळतो.

चक्रासन –

यामुळे तणाव दूर होतो. शरीरातील चरबी कमी होते आणि हात, पाय आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात.

पश्चिमोत्तानासन –

हे आसन केल्याने पोटाची चरबी कमी होते. हाडांमध्ये लवचिकता येते. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

सेतूबंधनासन –

हे योगासन केल्यास पाठीच्या आणि नितंबांच्या दुखण्यास आराम मिळतो आणि शरीराच्या खालच्या भागाला देखील आराम मिळतो.

वज्रासन –

पाठीच्या कण्यातील दोष नष्ट होतात. गुडघेदुखी असणाऱ्यांनी हे आसन करू नये. हे योगासन केल्याने जेवण पचण्यास मदत होते.

भुजंगासन –

शरीराच्या वरच्या भागास ताण तर जाणवतो तसेच चेहऱ्यावर चमक सुद्धा देते. हे योगासन केल्यामुळे आपले शरीर सुदृढ राहते.

तितली आसन –

हे आसन केल्याने मासिक पाळी तर नियमित राहतेच. त्याचबरोबर मांडी दुखणे किंवा पाय दुखणे देखील कमी होते .

शीर्षासन –

महिलांच्या सर्वात जास्त समस्या केस गळती असते आणि त्यामुळे स्त्रियांना खूप त्रास होतो . तर आपण प्रतिदिन हे शीर्षासन केल्यास केसगळतीच्या समस्या दुर होतील.

Latest Posts

Don't Miss