spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नॅचरल मेकअपने सौंदर्य वाढवण्यासाठी काही टिप्स

जर तुम्हाला तुमचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल, तर यासाठी शक्यतो मेकअप पासून तुम्ही दूर राहीलं पाहिजे.

ज्या लोकांना मेकअपची आवड नसते त्यांना नॅचरल मेकअप करायला आवडतो. नॅचरल मेकअपचा ट्रेण्ड आहे. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या क्रीम आणि मेकअप प्रोडक्टचाच वापर करावा, असा काही नियम नव्हे. बाजारात मिळणाऱ्या स्किन केअर प्रोडक्टमुळे चेहऱ्यावर चमक येईल पण याचे परिणाम काही दिवसांपुरतेच मर्यादित राहतील. त्वचेला दीर्घकाळासाठी फायदे हवे असल्यास नैसर्गिक-आयुर्वेदिक उपचारांची मदत घ्या.

नॅचरल मेकअपने सौंदर्य वाढवण्यासाठी टिप्स –

  • जर तुम्हाला नॅचरल मेकअप लुक हवा असेल तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची काळजी घ्यावी लागेल.
  • जर तुमची त्वचा निस्तेज असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी कोणतेही उत्पादन तुमच्या चेहऱ्यावर झटपट चमक आणू शकत नाही.
  • नॅचरल मेकअप साठी तुम्ही फाऊंडेन्सशन वापरा बीबी क्रीम किंवा हळदी आणि दुधाची मलाई मिक्स करून तुम्ही चेहऱ्यवर लावू शकता.
  • नॅचरल आणि चमकदार चेहऱ्यासाठी गुलाब पाण्याचे काही थेंबसुद्धा तुम्ही लावू शकता.

  • ब्लश अतिशय काळजीपूर्वक वापरा. जास्त ब्लश वापरल्याने तुमचा चेहऱ्यावर नॅचरल मेकअप दिसणार नाही.
  • मेकअप करताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोसमॅटिक्स आपण वापरतो. त्यामध्ये अनेक प्रकारची रसायने असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवू शकते.
  • जर तुम्हाला तुमचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल, तर यासाठी शक्यतो मेकअप पासून तुम्ही दूर राहीलं पाहिजे.

हे ही वाचा:

फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प हातातून निसटला कसा? राज ठाकरेंचा सवाल

फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प हातातून निसटला कसा? राज ठाकरेंचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss