चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी खास घरगुती उपाय

प्रत्येकाला सुंदर दिसावे असे वाटत असते.

चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी खास घरगुती उपाय

प्रत्येकाला सुंदर दिसावे असे वाटत असते. त्यासाठी आपण काहींना काहीं उपाय करतो. पण तरीही काही जणांच्या चेहऱ्यावर काळे डाग येत असतात. चेहऱ्यावर अचानक झालेल्या जखमा अथवा डाग हे आपल्याला नक्कीच नकोसे वाटतात. आजकाल प्रदूषण, धूळ, माती यांच्या संपर्कामुळे त्वचेला कित्येक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशावेळी डाग जाण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाणे देखील पर्यायी समजतो. परंतु हेच काळे डाग जाण्यासाठी काही घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे ही वाचा : डोळ्याची काळजी कशी घ्यावी?

 

घरगुती उपाय –

चंदन आपण आपल्या चेहऱ्यासाठी नेहमीच वापरतो. चंदनाचा फेसपॅक चेहऱ्याला उजळपणा मिळवून देतो. शुद्ध चंदनामुळे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी पोषक तत्व असतात. तसंच तुम्ही चंदन पाण्यात अथवा गुलाबपाण्यात अथवा दुधामध्ये मिक्स करून तुमच्या चेहऱ्याला लावतात. तर, तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. चंदन पावडरमध्ये अँटिबॅक्टेरियल तत्व असतात. त्यामुळे चेहऱ्यासाठी तो उपयुक्त ठरतो.

चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी तुम्ही हळदी आणि दुधाची साय मिक्सकरून देखील लावू शकता.

काकडी तुमच्या चेहऱ्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. रोज काकडी नियमितपणे वापरल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल. रोज काकडीचे काप डोळ्यावर लावा १० मिनिटे लावा त्यामुळे तुमच्या डोळ्याखाली वर्तुळे जाण्यास मदत होते आणि तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळतो तसेच तुमचा चेहरा ही देखील फ्रेश वाटो.

 

मेथीच्या पानांत फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम, सोडियम, झिंक आणि कॉपर असतं. चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी याची मदत होते. ह्याचा उपयोग करण्यासाठी मेथीच्या पानांची पेस्ट करुन घ्यावी. आता ही पेस्ट डाग पडलेल्या जागेवर अर्धा तास लावून ठेवावी. पेस्ट नीट सुकल्यानंतर गार पाण्याने धुवून टाकावी.

पपई चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरते. पपईचे तुकडे कापून मिक्सर मध्ये बारीक वाटून त्याचा रस बनवून घ्याचा आणि पपईचा रस चेहऱ्यावर लावायचा.

हे ही वाचा : 

दहीवडे बनवण्याची साधी आणि सोपी रेसिपी

 

Exit mobile version