डोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी खास घरगुती उपाय

पुरेशी झोप न झाल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळे येतात.

डोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी खास घरगुती उपाय

पुरेशी झोप न झाल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळे येतात. त्यामुळे डोळ्यांवर ताण, अस्पष्ट दृष्टी आणि सर्वात वाईट म्हणजे दृष्टी कमी होणे यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. डोळ्याखाली काळी वर्तुळे असल्यास काही जणांना त्रास होतो. काळी वर्तुळांची समस्या ही तणावमुळे आणि थकवा आल्यामुळे ही असू शकते. डार्क सरकल असल्यास तुम्ही घरगुती उपाय सुद्धा करू शकता. आजच्या दगदगीच्या जीवनात आपण आपल्या आहाराकडे आणि शरीराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्याला अशक्तपणा डोकेदुखी अशी लक्षणे जाणवतात. तरुण असतानाच डोळ्याखाली चारी बाजूला बारीक रेषा दिसू लागतात. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्वचेवर सुरकुत्या दिसतात आणि आपल्या चेहऱ्यावर ताण पडतो.

हे ही वाचा :पोटावर झोपल्यास तुमच्या आरोग्यावर होतील परिणाम…

 

डार्क सर्कल्स जाण्यासाठी काही घरगुती उपाय –

गरजेपेक्षा जास्त झोप, खूप जास्त थकवा किंवा मग आपल्या झोपण्याच्या सामान्य वेळेपेक्षा जास्त वेळ जागे राहिल्यानेही डार्क सर्कलची समस्या होऊ शकते. डार्क सर्कल जाण्यासाठी आरोग्याला पुरेशी झोप गरजेची आहे.

डार्क सर्कल्स जाण्यासाठी आपण रात्री झोपायच्या वेळी नारळाच तेल किंवा बदामाच्या तेलाचे थेंब घेऊन डोळ्याखाली लावू शकतो.

 

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी तुम्हाला वेळेवर आहार घेणे फार गरजेचे आहे. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फळे आणि भरपूर प्रमाणात पाणी पिणे उपयुक्त आहे .

कच्चे टोमॅटो आणि काकडी गोल राउंड मध्ये कापून डोळ्यांवर लावून ठेवणे यामुळे डोळ्यांना थंडता मिळते आणि हळू हळू डार्क सर्कल्स जाण्यास मदत ही होते.

लिंबाच्या रसाचे थेंब लावल्यास डार्क सर्कल्स कमी होतात.

जर तुम्ही बाहेर जाताना मेकअप करून जात असाल तर झोपायचा अगोदर चेहरा नीट स्वच्छ धुवून घ्यावा त्यांनी देखील डार्क सर्कल्स जाण्यास मदत होते.

हे ही वाचा :

मुंबई-उपनगरात पाऊस सुरूच, लोकल सेवेवर परिणाम

 

Exit mobile version