गर्भपात झालेल्या महिलांसाठी ‘खास’ बातमी

गर्भपात झालेल्या महिलांसाठी ‘खास’ बातमी

गर्भपात हा स्त्रियांसाठी एक वाईट अनुभव असतो . गर्भपात झाल्यानंतर पोषक आहार घेणे गरजेचे आहे . भावनिक आधार विश्रांती देखील गरचेचे आहे . गर्भपात झाल्यास स्त्रिया शारीरिक आणि मानसिकरित्या खूप कमकुवत झालेल्या असतात. शरीरात आयरनची कमतरता निर्माण होते. यामुळे एनीमियाची समस्या निर्माण होऊ शकते. वारंवार चक्कर येणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे अशा समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते. अशा वेळी महिलांचा आहार त्यांचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत करु शकतो.

हे ही वाचा : तारुण्यात सुरकुत्याची समस्या? हे पदार्थ खाणे टाळा

 

गर्भपात झाल्यानंतर शरीरातील सर्व कॅल्शिम गर्भाच्या उतीसह काढून टाकले जाते . म्हणून कॅल्शिमची कमतरता जाणवते . म्हणून स्त्रियांना हिरव्या पालेभाज्या, दुधाचे पदार्थ , मासे , अंजीर , खजूर , काजू हे खावे .

शरीरासोबतच मनाला आनंद देण्यासाठी आवडत्या पदार्थांचे सेवन करा. या काळात स्वतःचे आरोग्य सुधारण्यासाठी हेल्दी पदार्थांसोबतच कधी-कधी आपल्या आवडीच्या पदार्थांचे सेवन अवश्य करावे. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य देखील चांगले राहिल.

गर्भपातानंतर तुम्ही फॉलक अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन अवश्य करावे. यासाठी तुम्हाला बदाम आणि अक्रोड हे पदार्थ डायटमध्ये समाविष्ट करावे लागतील.

 

गर्भपातानंतर अनेक महिलांना उल्टी आणि मळमळ सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. पचनासंबंधीत समस्या होतात. शरीरातील हार्मोनल चेंजेंसमुळे या समस्या होतात. अशा वेळी महिलांनी घाबरू नये. या काळात भरपूर पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेट ठेवावे. या काळात तुम्ही विविध सूप आणि पेय आहारात समाविष्ट करु शकता.

शरीर बरे होण्यासाठी प्रथिने युक्त पदार्थ खावे . म्हणून आपण अंडी, मासे, दूध, चीज, मसूर ह्यासारखे पदार्थ खावे . डाळ, छोले, पनीर हे पदार्थ प्रथिन युक्त असते. म्हणून या पदार्थचा आहारात समावेश करावा .

फळे आणि भाज्या यांचा नक्की आहारामध्ये समावेश करावा . द्राक्षे, संत्री, लिंबू इत्यादी फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते आणि शरीरासाठी ही फळे उपयुक्त असते .

हे ही वाचा :

ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यासाठी प्या ही ३ पेय, दिसाल फ्रेश

 

 

Exit mobile version