spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अतिरिक्त तणाव असल्यास या पदार्थांचे सेवन करून दूर करू शकता ताण

ताणतणाव असल्याने तुम्ही या पदार्थाचे सेवन करू शकता.

अतिरिक्त तणाव असल्यास शरीरावर होतात परिमाण होतात. तणावाचा केवळ मनावरच नाही तर शरीरावरही परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेक गंभीर शारीरिक आजार होण्याची शक्यता असते, दैनंदिन जीवन जगणे कठीण करू शकतात. ताणतणाव असल्यास आपली चिडचिड होणे,एकाग्रता कमी होते. कित्येकदा तणावातच चुकीच्या सवयी किंवा व्यसन आत्मसात केले जातात.ताणतणाव असल्याने तुम्ही या पदार्थाचे सेवन करू शकता.

तणावाची लक्षणे – पित्ताचा विकार, भूक न लागणे, वजन कमी होणे, हृदयरोग, दमा, रक्तदाब, मधुमेह, यकृत / मूत्रपिंड आदींचे विकार, इ.

मानसिक – लगेच दमणे, अतिरिक्त राग येणे, विकृत व्यक्तीमत्त्व, निरुत्साह, उदासीनता, निद्रानाश, विस्मरण, भावनाविवशता, इ.

ताणतणाव दूर करण्याचे पदार्थ – दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दही खाल्ल्याने आपला सर्व ताण दूर होतो. मानसिक आरोग्यासाठी दही खूप फायदेशीर आहे.केळी आणि भोपळ्याच्या बिया पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहेत.आणि त्या पासून रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. मनुके आणि केसर पाण्यात भिजवा आणि सकाळी त्याचे सेवन करा.आणि बदाम रात्री भिजून पाण्यात ठेवल्यास सकाळी उठल्यावर त्याचे सेवन केल्यास बुद्धी वाढण्यास मदत होते.

तणाव दूर करण्यासाठी शरीराला क्रियाशील ठेवा. योगा आणि व्यायाम तणाव दूर करण्यात फायदेशीर ठरतात, त्यामुळे याचा आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये समावेश करा. झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायल्याने झोप चांगली लागते.बहुतेक लोक आपला जास्त वेळ मोबाईलवर घालवतात. ज्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. ते आरोग्यासाठी घातक असू शकते.झोपेच्या एक तास मोबाईल आपल्यापासून दूर ठेवा.तणाव टाळण्यासाठी आपली दिनचर्या बदला. चांगले आणि निरोगी अन्न खा आणि व्यायामाची सवय लावा. अश्वगंधा ही एक पारंपरिक औषधी वनस्पती आहे जी स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, हे मधुमेह, जळजळ, तणाव आणि चिंता दूर करण्यास मदत करते.

हे ही वाचा:

सीएम एकनाथ शिंदेंचे राज्यपालांना पत्र,१२ एमएलसी जागांसाठी ठाकरेंची यादी फेटाळण्याची मागणी

मोठी बातमी! वांद्र्यात लपून बसलेल्या संशयित दहशतवाद्याला बेड्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss