ऍसिडिटीचा त्रासाने त्रस्त आहात ? मग करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

ऍसिडिटीचा त्रासाने त्रस्त आहात ? मग करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Acidity : आजकाल लोकांना ऍसिडिटीचा खूप त्रास होतो. ऍसिडिटीचा त्रास झाल्यास कंबरदुखी, पोटदुखी, डोकेदुखी अशी समस्या उद्भवत असते. काही लोकांना ऍसिडिटी झाल्यास मळमळ सारखे होते. बहुतेक लोक ऍसिडिटी झाल्यास औषध उपचार करतात तरीही देखील ऍसिडिटीचा त्रास कमी होत नाही. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांनी काही घरगुती उपाय केल्यास ऍसिडिटीचा त्रास कमी होऊ शकतो. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून ऍसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी काही आयुर्वेदातील उपाय सांगणार आहोत.

आयुर्वेदामध्ये ऍसिडीटी ठीक होण्यास अनेक उपाय सांगितले आहे. जर तुम्ही त्याचा नियमितपणे वापर केला तर तुमच्या ऍसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत होईल. ऍसिडिटीचा त्रास झाल्यास पाणी जास्त प्रमाणात पिणे. कमी प्रमाणात पाणी (water) पिल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो. ऍसिडिटीचा (Acidity) त्रास होऊ नये म्हणून किमान ८ ग्लास तरी नियमितपणे पाणी पिणे. कधीही ऍसिडिटीचा त्रास झाल्यास जास्त प्रमाणात पाणी पिणे.

 

ऍसिडिटी (Acidity) कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीचा वापर करू शकता. सकाळी उठल्यावर तुळशीचे पाने ३ ते ४ चघळणे किंवा तुळशीचे (tulsi) पाने वापरून काडा बनवणे आणि त्याचे सेवन करणे, आयुर्वेदात तुळशीच्या पानाला खुप महत्व आहे, तसेच तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात.

केळ्यांमध्ये (banana) भरपूर प्रमाणात फायबर (fiber) आढळून येते. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि पोटाच्या अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते. म्हणून ऍसिडिटी झाल्यास केळ्यांचे सेवन करणे. तसेच तुम्ही ऍसिडिटी दूर करण्यासाठी ताकाचा देखील वापर करू शकता. ताक हे एक प्रकारचे थंड पेय आहे. जे अन्न पचवण्यास मदत करते.

नारळ पाणी (Coconut water) पिल्याने ऍसिडिटीचा (Acidity) त्रास कमी होतो. कारण नारळ पाणी मध्ये व्हिटॅमिन (vitamin) आणि अनेक पोषक घटक असतात. जर तुम्हाला गॅसचा त्रास झाला तर २, ३ वेळा नारळ पाणी पिणे.

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version