अनियमित पाळीमुळे त्रस्त आहात? मग नियमित पाळी येण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

अनियमित पाळीमुळे त्रस्त आहात? मग नियमित पाळी  येण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

अनेक महिलांना मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या असते. भारतात, पूर्वीपेक्षा अधिक उघडपणे मासिक पाळी बद्दल बोलले जाते. पण मासिक पाळी संबंधित समस्यांकडे किती महिला गांभीर्याने लक्ष देतात हे सांगणे कठीण आहे. अशा स्थितीत तुम्हाला अनियमित मासिक पाळीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी माहित असायला हव्यात.

हे ही वाचा : ऑनलाईन शॉपिंग करताय ? तर या टिप्स नक्की फॉलो करा

 

मासिक पाळी वेळेवर येत नसल्यास तुम्हाला अनेक समस्याला सामोरे जावे लागते . मासिक पाळी जास्त प्रमाणात येत नसेल तर शरीरात लोहाची कमतरता आहे जे एनोमियाचे लक्षण असू शकते. याशिवाय, यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगदेखील होऊ शकते .

अशा स्थितीत, अनियमित मासिक पाळीवर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे. यामध्ये पोषक आहार, संतुलित व्यायामासह निरोगी जीवनशैलीचे पालन करणे गरजेचे आहे. अनियमित मासिक पाळीची समस्या असलेल्या महिलांना तज्ञ काही फळे खाण्यास सांगतात .

 

गर्भनिरोधक गोळ्या बदलणे किंवा काही औषधे वापरणे, खूप व्यायाम, गर्भधारणा किंवा स्तनपान, ताण, थायरॉईड, गर्भाशयाचे किंवा पॉलीप्सचे अस्तर घट्ट होणे. अनियमित पाळीची काही करणे असू शकतात. त्यामुळे अनियमित मासिक पाळीत नियमितपणे फळे खाणे गरजेचे आहे.

संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन-सी असते . आणि संत्री हे फळ खाल्यास जळजळ कमी होते . अनियमित मासिक पाळीसाठी संत्री खाणे उत्तम आहे . व्हिटॅमिन-सीचा समावेश लिंबू, किवी आणि आंब्यामध्ये देखील असतो. ही फळे नियमितपणे खाल्ल्याने मासिक पाळी वेळेवर येते .

अनियमित मासिक पाळी असलेल्या महिलांनी आवळा खाणे फायद्याचे ठरू शकते. आवळ्यामध्ये औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे पाळी नियमितपणे येते .

डाळिंब हे फळ मासिक पाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव, गर्भाशयाचा असामान्य आकार इत्यादी समस्यांपासून आराम देऊ शकते. यासोबतच गर्भाशयाशी संबंधित समस्यांवरही याच्या सेवनाने काही प्रमाणात मात करता येते.

अननसात ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते. ज्यामुळे तुमची मासिक पाळी सुरू होते. हे फळ लाल आणि पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन देखील वाढवते, ज्यामुळे रक्त प्रवाहास मदत होते.

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 भरपूर प्रमाणात असते. ते आतड्यांच्या हालचाली आणि पचनास मदत करते .

हे ही वाचा :

पपईसोबत चुकून ही फळे खाऊ नका, नाहीतर होऊ शकतो गंभीर आजार

 

Exit mobile version