Tuesday, July 2, 2024

Latest Posts

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून दूर राहा; ‘अशी’ घ्या मुलांची काळजी

पावसाळा सुरु झाल्यापासून मुले आजारी पडल्याचे प्रमाण वाढले आहे. अचानक झालेल्या हवेच्या बदलामुळे मुलांच्या आरोग्याच्या समस्यादेखील वाढल्या आहेत. म्हणूनच या काळात, काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

पावसाळा सुरु झाला की मुलांना संसर्गजन्य आजार होण्याची सुरुवात होते. पावसाळ्यातील हवेत आद्रतेचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे या हवामानात लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळा सुरु झाल्यापासून मुले आजारी पडल्याचे प्रमाण वाढले आहे. अचानक झालेल्या हवेच्या बदलामुळे मुलांच्या आरोग्याच्या समस्यादेखील वाढल्या आहेत. म्हणूनच या काळात, काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

पावसाच्या नव्या पाण्याबरोबरच साथीच्या रोगाचं प्रमाण वाढते. प्रामुख्याने सर्दी आणि तापाच्या तक्रारी अधिक दिसून येत आहेत. अशुद्ध पाण्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, टायफॉईड अशा विकारांना आमंत्रण येते. पावसाळ्यात थंडीचे प्रमाण हे सतत कमीजास्त होत असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरात चालणाऱ्या क्रियांवरही होतो त्यामुळे आपली पचनशक्ती तसेच रोगप्रतिकारकशक्ती मंदावते. पावसाळ्यात दूषित पाणी आणि दूषित अन्नाचे प्रमाण वाढलेले असते. प्रामुख्याने व्हायरल ताप, सर्दी, खोकला, न्यूमोनिया, ब्रोकींओलायटिस अशा श्वसनाचे आजार, डेंग्यूताप, मलेरिया डासांपासून होणारे आजार, कावीळ, टायफॉइड, गॅस्ट्रो हे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा समावेश असतो. लहान मुलांमध्ये सूक्ष्म जंतूमुळे होणाऱ्या संसर्गामुळे आजाराविरुद्ध लढणारी प्रतिकारशक्ती अविकसित असते. या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जातो. असा रोगांपासून आपल्या मुलांना दूर ठेवायचे असेल पालकांनी पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे.

कोणती काळजी घ्यावी 

  • पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी अस्वच्छ पाणी साचते. या साचलेल्या पावसाच्या पाण्यात लहान मुले खेळतात. तीच हाताची बोटे तोंडात घालतात. त्यामुळे मुले आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून पालकांनी मुलांना अस्वच्छ पाण्यात खेळायला देऊ नये. याचबरोबर घराभोवती पावसाचे पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या.
  • दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण हे वाढले आहे. हे आजार टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पाणी पिताना नेहमी उकळून प्यावे.
  • पावसाळ्यात थंड झालेले अन्नपदार्थ खाण्यापूर्वी पुन्हा गरम करून घ्या. पावसाळ्यात डास आणि माश्यांचे प्रमाण वाढते.  माश्यांपासून संरक्षण करण्यासाठी अन्नपदार्थ झाकून ठेवा. तसेच माश्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी फरशी नेहमी कोरडी ठेवा. जंतुनाशकांचा वापर करा.
  • पावसाळ्याच्या पाण्याने केस चिकट होतात. केसात कोंडा होतो. त्यासाठी सौम्य शॅम्पू वापरा. तसेच पावसाळ्यात ओले कपडे अंगावर अधिक काळ राहिल्यास गजकर्ण आणि विविध त्वचारोग होऊ शकतात. हे त्वचारोग होऊ नये म्हणून स्वच्छता राखा.
  • पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण दिसून येते. डेंग्यू , मलेरियासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.

हे ही वाचा

लग्नात Sonakshi Sinha चे भाऊ नाराज?, बॉलिवूड अभिनेत्याने वाचवली लाज…

मी एकटा पडलोय पण मी मागे हटत नाही – Manoj Jarange

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss