spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मेकअप करण्यापूर्वी घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

आधुनिक युगात मेकअपची व्याख्या बदलली आहे. मेकअप हा आवश्‍यकच असतो अशी खात्री मुलींची झालेली आहे. प्रत्येक तरुणीला आपण सुंदर दिसावे असं वाटतंच.

आधुनिक युगात मेकअपची व्याख्या बदलली आहे. मेकअप हा आवश्‍यकच असतो अशी खात्री मुलींची झालेली आहे. प्रत्येक तरुणीला आपण सुंदर दिसावे असं वाटतंच. परंतु मेकअप करताना आपल्याला नक्की कुठं जायचं हे लक्षात घेतले पाहिजे. दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळपासून कडाक्याची थंडी असं काहीसं विचित्र वातावरण सध्या अनुभवायला मिळतंय. ऊन्हाच्या तुलनेत थंडीचा कडाका जरा अधिक असल्याने या दिवसात त्वचा कोरडी आणि शुष्क होते. रात्रीच्या वेळी पार्टीला वगैरे जायचे असेल तर, मेकअप हा गडद व चमकदार हवा, पण दिवसाची वेळ असेल तर मात्र मेकअप हलका व नैसर्गिकच असला पाहिजे. म्हणूनच मेकअप करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे :-

  • मेकअप करण्यापूर्वी फेशियल करायला हवं. वाटल्यास त्वचा अधिक चमकदार होण्यासाठी चेहऱ्यावर कॅडिला काकडीयुक्त फेस पॅक अथवा लॅक्‍मे रिव्हायलायझिंग फेस स्क्रब, समारा डीप क्‍लिजिंग मास्क वा कॅडिला ऑरेंज पील फेस मास्क लावा. नंतर ब्लिचिंग करा. यामुळे या भागाची त्वचा स्वच्छ व चमकदार दिसू लागेल.
  • हातापायांवर मॅनिक्‍युअर व पॅडिक्‍युअर करा. हातापायांवर अधिक लव असेल तर वॅक्‍सिंग अन्‌ कमी लव असेल तर ब्लिचिंग करा.
  • मेकअपसाठी लागणारं साहित्य मान्यताप्राप्त कंपन्यांचंच वापरा. मेकअप साहित्याची अलर्जी असेल तर ते कोणत्याही कारणास्तव ते वापरू नका. त्याने त्वचेवर दीर्घकाळ इन्फेक्शनसारखा विकार जडू शकतो. त्वचेनुसार योग्य खबरदारी घेऊन मेकअप केलात तर तुम्ही निर्धास्त होऊन बाहेर पडू शकता.
  • तुमच्या त्वचेनुसार प्रायमर आणि लोशन यांचा वापर करा.
  • डोळ्यांखाली काळी वर्तुळं असतील तर ती झाकण्याच्या नादात डोळ्यांभोवती मेकअपचा फार थर चढवू नका. डोळ्यांभोवतीची त्वचा फारच नाजूक असते. त्यामुळे तिला इन्फेक्शन झाल्यास ते डोळ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतं.
  • मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याला स्किन टोनर लावावे. उन्हाळ्यामध्ये फाउंडेशन लावल्याने थोडं जड वाटू शकते. अशावेळी टिण्टेड मॉइश्चरायझर लावावे. हे दोन प्रकारे काम करते. यामुळे त्वचेला आद्रता मिळते आणि चेहऱ्यावर समान टोन येतो.
  • लिपस्टिक किंवा आय शॅडो लावताना त्वचेला शोभून दिसतील अशा लाइट पेस्टल शेड्स निवडा. सध्या पेस्टल शेडचा ट्रेंड आहे. थोडी चमक असलेले सॉफ्ट रंग तुम्हाला उत्तम समर लूक मिळवून देतील आणि त्याचबरोबर तुमचा चेहराही उजळवतील. याचा आणखी एक फायदा म्हणजे मेकअप उतरू लागला तर पटकन लक्षात येणार नाही.

हे ही वाचा :-

देशाच्या बर्फाच्छादित डोंगररांगांपासून ते समुद्राच्या तळापर्यंत फडकला तिरंगा

Latest Posts

Don't Miss