spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Take care of your eyes in winter हिवाळयात डोळ्यांची काळजी अशी घ्यावी

Eye Care : हिवाळयात (winter season) आरोग्याची काळजी (Eye Care ) घेणे गरजेची असते त्याच बरोबर डोळयांची देखील काळजी घेणे गरजेची आहे. उन्हाळ्यात आपण डोळ्यांच्या आरोग्याला खूप जपतो, तसेच हिवाळयात देखील डोळ्यांच्या आरोग्याला जपणे गरजेचे आहे. डोळे हा फार नाजूक अवयव आहे. कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचा अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. आजकाल डोळ्यांसंभंधित खूप आजार वाढतांना दिसत आहे. म्हणून हिवाळ्यात डोळ्यांची काळजी (Eye Care ) घेणे गरजेची आहे. तर आज आम्ही तुम्हाला या लेख मधून डोळ्यांची काळजी कशा प्रकारे घ्यावी या बद्दल सांगणार आहोत.

हिवाळयात कशी घ्यावी डोळयांची काळजी ?

हिवाळयात डोळे कोरडे पडण्याची शक्यता असते, त्यासाठी ओमेगा ३ फॅटी ऍसिडचे (Omega 3 fatty acids) सेवन करावे. त्यासाठी पालक ब्रोकोलीनचे सेवन करावे, या पदार्थाचे सेवन केल्याने डोळे कोरडे होत नाही. त्याच बरोबर तुम्ही डोळे कोरडे होऊ नये म्हणून पाणी जास्त प्रमाणात ठेवावे पाणी जास्त प्याल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

डोळ्यांना दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने धुवा.

 

डोळ्यांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी दररोज सकाळी चप्पल न घालता गवतावर चालावे.

उन्हात जाताना सनग्लासेसचा वापर करा. यामुळे डोळ्यांची हानी होत नाही.

दीर्घकाळापर्यंत कॉम्प्युटर तसेच पुस्तक वाचल्याने डोळ्यांवर नकारात्मक प्रभाव पडतो. म्हणून १० मिनिटांच्या एक लहान ब्रेक घ्यावा. या वेळेत स्क्रीनवरून

डोळे सरकवून दूरवर दृष्टी टाकावी व पापण्यांची उघडझाप करावी.

हिवाळा म्हटल्यावर लग्न सराई चालू होती. लग्नसराई म्हटल्यावर मेकअप वगरे येतोच त्याच बरोबर आपण आय मेकअप देखील करतो, पण आय मेकअप रिमूव्हर करतांना आय मेकअप रिमूव्हर वापरणे. कारण यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची दाट शक्यता असते. मेकअप मुळे डोळ्यांची जळजळ होण्याची देखील शक्यता असते.

आहारामध्ये पालेभज्याचा समावेश करा.

रात्रीचे जागरण कमी करा.

हे ही वाचा :

छोल्यांपासून बनवा चविष्ट मसाले पकोडे

 

 

 

Latest Posts

Don't Miss