हिवाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

हिवाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर वेगवेगळे परिणाम होत असतात आणि त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मुंबईमध्ये वातावरणात नेहमीच चढउतार होताना दिसत असतात. बदलत्या वातावरणात तुम्ही योग्य अन्नपदार्थांचे सेवन केल्यास तुमच्या आरोग्याची नीट काळजी घेऊ शकता. तसेच आता थंडीचा महिना जवळ आला आहे, तर आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे . तसेच थंडी मध्ये खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे अशा तक्रारी डोके वर काढतात. थंडीत ताप येणे, श्‍वसनविकार, दमा, कोरडा खोकला अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते.

थंडीच्या दिवसात रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे . रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करू शकता.

सुके खजूर हे एक ड्रायफ्रूट आहे. तूम्ही रोज सुके खजूर दुधासोबत किंवा असेच देखील खाऊ शकता खजूरामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. रोज २ किंवा ३ खजूर खाल्ले पाहिजेत.

थंडीच्या काळात हळद-दूध, कॉफी, तुळशीचा चहा यांचे सेवन करावे. शिळे अन्नपदार्थ, उघड्यावरील पदार्थ, दही, लस्सी, थंडपेय टाळावीत.

थंडीच्या काळात पौष्टिक खाद्य, सुकामेवा, फळांचा आहार, हे खाणे फायदेशीर ठरते.

थंडीच्या काळात नियमितपणे व्यायाम आणि योगासने केल्यामुळे शरीर तंदुरस्त राहते.

थंडीत पायाचे तळवे कडक होतात. त्यासाठी कोमट पाण्याने पाय दोन ते तीन वेळा धुवा त्यामुळे पायाचा तळवा कोरडा न पडता मऊ राहण्यास मदत होईल.

थंडी मध्ये केस गळती किंवा केस तुटण्याची समस्या वाढते त्यासाठी तुम्ही टाळूला कोमट खोबरे तेल लावू शकता.

थंडीत रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवावे. हिवाळ्यात मिठाचे सेवन कमी प्रमाणात करावे. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो.

Exit mobile version