हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी…

हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी…

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे फार गरजेचे आहे. कारण हिवाळ्यात त्वचा आपली कोरडी पडते. हिवाळ्यात थंडीचे प्रमाण जास्त असते. हिवाळ्यात वातावरणातील ह्यूमीडिटी कमी होते. त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होते त्यामुळेच त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. त्वचा कोरडी पडल्यास त्वचेवर रेषेस उमटतात. त्यामुळे त्वचेचा अनेक समस्या जाणवतात. त्यासाठी त्वचेची विशेष काळजी घ्याला पाहिजे. तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे या बद्दल सांगणार आहोत.

हे ही वाचा:  तुरीच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे…

 

सर्व प्रथम सकाळी उठल्यावर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हिवाळ्यात थंड पाण्याने चेहरा धुहू नये. कधीपण चेहरा गरम पाण्याने धुवावा. चेहरा धुतांना फेसवॉश वापरावा.

हिवाळ्याच्या दिवसात त्वचा कोरडी पडू नये म्हणून बॉडीला बॉडी लोशन (body lotion for dry skin) लावणे यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. गरम पाण्याचा वापर जास्त प्रमाणात करून नये शक्यतो कोमट गरम पाणी वापरणे.

रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुहून घ्या. नंतर चेहरा स्वच्छ धुहून झाल्यानंतर टॉवेल नये पुसून घ्या. सीरम लावून घ्या.

थंडी मध्ये नियमित पणे व्यायाम, योगासने कराव. त्यामुळे त्वचेला फरक जास्त जाणवतो. हिवाळ्यात जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खावे. कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर , प्रथिने, जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहते. आणि त्वचेला देखील फरक जाणवतो.

तुम्ही हिवाळ्यात फेस वॉश वापरू शकता. तसेच तुम्ही त्वचेला मुलतानी माती आणि त्यामध्ये थोडे गुलाब पाणी मिक्सकरून ते त्वचेला लावू शकतात. किंवा तुम्ही फ्रुट पासून फेस वॉश बनवून तो देखील त्वचेला लावू शकता.

त्वचा हिवाळ्यात निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही प्राणायाम करू शकता. प्राणायाम केल्याने शरीराला आणि त्वचेला उत्तम ऊर्जा मिळते. हिवाळ्यात शरीराला ऊर्जा खूप महत्वाची असते. त्यामुळे रोज नियमितपणे प्राणायाम करणे.

हिवाळ्यात लोक पाणी पिणे खूप कमी करतात. त्यामुळे शरीरातील डिहायड्रेशन वाढते आणि त्वचा काळी दिसू लागते. अशा परिस्थितीत हिवाळ्यात अधिकाधिक पाणी प्या.

हे ही वाचा:  

मुंबईकरांना रेल्वे कडून अनोखे दिवाळी गिफ्ट !

 

Exit mobile version