Sunday, September 29, 2024

Latest Posts

नारळ पाणी पिताना घ्या आरोग्याची काळजी, नाहीतर…

नारळ पाणी पियायला सर्वांनाच आवडते. नारळ पाणी पिण्याने शरीराला थंडावा मिळतो. अशक्तपणा असल्यास नारळ पाणी लोक सेवन करतात.

नारळ पाणी पियायला सर्वांनाच आवडते. नारळ पाणी पिण्याने शरीराला थंडावा मिळतो. अशक्तपणा असल्यास नारळ पाणी लोक सेवन करतात. पण काहीजण जास्त प्रमाणत याचे सेवन करतात. जास्त प्रमाणत सेवन केल्यास सर्दी, खोखला या सारखे लक्षणे दिसून येतात.

नारळ पाणी प्यायल्याने इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते. त्यामुळे ज्या लोकांना जास्त पोटॅशियमची समस्या आहे, त्यांनी हे नारळ पाणी पिण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण इलेक्ट्रोलाइट्सपेक्षा जास्त असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटॅशियमची पातळी झपाट्याने वाढते.

नारळ पाण्याचे सेवन केल्यास रक्तदाब कमी होतो. ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी नारळ पाणी पिण्याचा अगोदर डॉक्टरांचा सला घेणे.

नारळाच्या पाण्यात कॅलरीज जास्त प्रमाणत असतात. जर तुम्ही नारळाचे पाणी जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढतील आणि तुमचे वजनही देखील वाढेल.

सिस्टिक फायब्रोसिस ही एक अनुवांशिक स्थिती आहे . यामुळे शरीरातील मिठाची पातळी कमी होते. नारळ पाण्यात खूप कमी प्रमाणत सोडियम आणि भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. ज्या लोकांना सिस्टिक फायब्रोसिसचा त्रास आहे त्यांनी नारळ पाणी पिऊ नये.

नारळ पाण्यात भरपूर पोटॅशियम असते, ज्यामुळे किडनीवर परिणाम होतो. जर तुम्हाला किडनीची समस्या असेल तर तुम्ही नारळ पाणी पिऊ नये.

नारळ पाणी तुमचा रक्तदाब कमी करू शकते, त्यामुळे शस्त्रक्रियेच्या त्रास असल्यास नारळ पाणी पिण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे.

पोटाशी संबंधित समस्या असतील तर त्यांनी जास्त प्रमाणात नारळ पाणी पिऊ नये. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू शकते आणि तुम्हाला लूज मोशन होऊ शकते. त्यामुळे पोटाच्या संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी नारळाच्या पाण्याचे सेवन करणे टाळावे.

हे ही वाचा:

विभागप्रमुखांनी प्रश्न विचारुन युवासेनेच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केला राग

Dasara Melava : अमृता फडणवीसांचे मोठं वक्तव्य म्हणाल्या, एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत…

Navratri 2022 : लालबागची माता नवरात्रोत्सवनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss