spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लिक्विड डाएट घ्या आणि लवकरात लवकर करा वजन कमी

वजन कमी करण्यासाठी आपण बरेचं प्रयत्न करत असतो. योगासन, शारीरिक व्यायाम, डाएट प्लॅन असे बरेच उपाय करुन आपण वजन कमी करतो. पण वजन कमी करण्यापेक्षा ते संतुलित ठेवणे कधीही चांगले असते. काही लोकांना लवकर व कुठलाही त्रास सहन न करता वजन कमी करायचे असते.

वजन कमी करण्यासाठी आपण बरेचं प्रयत्न करत असतो. योगासन, शारीरिक व्यायाम, डाएट प्लॅन असे बरेच उपाय करुन आपण वजन कमी करतो. पण वजन कमी करण्यापेक्षा ते संतुलित ठेवणे कधीही चांगले असते. काही लोकांना लवकर व कुठलाही त्रास सहन न करता वजन कमी करायचे असते. त्यासाठी लिक्वीड (Liquid diet) डाएटचा उपयोग करा. लिक्वीड डाएट हा डाएटचा एक प्रकार आहे. यात तूम्ही फक्तं द्रव स्वरूपातील पदार्थ खाऊन तुमचे वजन कमी करू शकता.

लिक्विड डाएट (liquid diet) चे प्रकार वजन कमी करणे हे बोलण जितकं सोप असत तितकच करणे कठीण. लिक्वीड diet ची शरीराला सवय नसल्याने महिनाभर लिक्वीड डाएट करण तुम्हाला कठीण जाऊ शकत.

  • डिटॉक्स अथवा क्लिंझिंग लिक्विड डाएट (detox liquid diet ) देखील तुम्ही करू शकतात. या आहारात तुम्हाला २४ तास फळ व भाज्यांचा ज्यूस घ्यायचा आहे. तोंडाला चव यावी यासाठी तुम्ही ज्यूस (juice) मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरू शकता. स्मुदी बनवून पियु शकता. फक्त साखर किंवा मिठाचा वापर केल्याने तुम्हाला हवा तसा फरक जाणवणार नाही. परंतु या लिक्वीड आहारामुळे तुमचे वजन लवकर कमी होत. तुम्ही २४ तास ताजे तवाने राहता.

 

  • मील रिप्लेसमेंट लिक्विड डाएट (mill replacement liquid diet ) या आहारामुळे तुमच्या शरीराला कमी प्रमाणात कॅलरी मिळतात व त्यामुळें वजन कमी होण्यास मदत होत. हे पदार्थ बाहेर सहज मिळतात. या पदार्थांमध्ये फॅट्स (fats) कमी व प्रोटीन (protin)आणि फायबर (fiber)जास्त असते.
  • मेडिकल लिक्विड डाएट (medical Liquid diet) हा आहार वजन कमी करण्यासाठी नाही तर काही विशिष्ट रुग्ण किंवा आरोग्य समस्या असणाऱ्या माणसांसाठी आहे.या आहारात तुम्हाला फक्त पाणी, सफरचंदाचा ज्यूस , सिरप आणि चहा घेण्याचा सल्ला देतात. एखादी शास्त्र क्रिया झाली असेल किंवा आरोग्य समस्या असेल तर डॉक्टर हा लिक्वीड आहार करण्याचा सल्ला देतात.

Latest Posts

Don't Miss