मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी करा हे उपाय…

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी करा हे उपाय…

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानसिक आजाराची लक्षणे दिसून येतात. मानसिक आजार हा कोणालाही होण्याची शक्यता असू शकते. मानसिक आजार म्हणजे काय ? तो कसा होतो ? त्याची लक्षणे कोणती ? या बद्दल आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. काहीजण तर मानसिक आजार झाल्यास मान्य देखील करत नाही. मानसिक आजार हा असा आहे की जो झाला तर लगेच स्वीकारला पाहिजे आणि त्यावर काहीतरी उपाय केले पाहिजे. तर आज आम्ही तुम्हाला मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. तर ते जाणून घ्या.

हे ही वाचा : हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी…

 

मानसिक आजार म्हणजे काय ? –

मेंदूचे काम जेव्हा बिघडते त्यावेळी मानसिक संतुलन बिघडते. यालाच मानसिक आजार असे म्हणतात. मेंदूमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांमुळे मानसिक आजार होतो. काहीवेळा मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत नाही. मानसिक आजार समजण्यासाठी रक्तपुरवठा दाखवणाऱ्या आणि पेशीमध्ये काही बदल असणाऱ्या तपासण्या कराव्या लागतात. यावरून आजाराचं कारण काय ते आपल्याला समजते.

मानसिक आजाराची लक्षणे –

मानसिक आजार कोणालाही होण्याची शक्यता असू शकते. जाणून घेऊया मानसिक आजाराची लक्षणे.
अचानक पणे घाबरणे
चक्कर येणे
सतत अस्वस्थतापणा वाटणे
आत्महत्येचा विचार येणे
घाम येणे
वाईट स्वप्ने पडणे
भुकेचे प्रमाण कमी होणे

मानसिक आजारावर उपाय –

ज्यांना मानसिक आजारांची लक्षणे जाणवतात त्यांनी नियमितपणे योगासने करणे. योगा केल्याने तुमची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतात मिळते आणि मनावरील ताण देखील कमी होतो. म्हणून नियमित पणे योगासने करणे.

मानसिक आजार दूर करण्यासाठी डोक्यामध्ये चांगले विचार असणे फार गरजेचे आहे. जर विचार चांगले असले तर मनही देखील चांगले राहते. त्यासाठी शरीराला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स गरजेचे असते. ज्या पदार्थामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात अश्या पदार्थाचे सेवन करावे.

काही गोष्टीमुळे आपली कधी कधी चिडचिड होते. पण मात्र काही आजार आहेत जे औषधाने बरे होतात. पण मानसिक आजार असल्यास तो औषधाने बरा होत नाही. पण मानसिक आजार हा बोलण्याने देखील बरा होऊ शकतो. म्हणजे नक्की काय करणे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल. बोलणे म्हणजे एकमेकांशी संवाद करणे आपल्या मनातील एखादी गोष्ट आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलणे. म्हणजे आपले मन मोकळे होते. संवाद हा खरं तर सर्वांसाठी महत्त्वाचा आहे.

नियमितपणे ध्यानसाधना करणे. ध्यानसाधना हा देखील महत्वाचा उपाय आहे. ध्यानसाधना केल्याने तुमचे मन चांगले नियंत्रित राहते. त्यामुळे मानसिक आजार बरे होण्यासाठी ध्यानसाधना करणे.

हे ही वाचा :

मधुमेहाच्या रुग्णांसाठी घरीच तयार करा शुगर फ्री लाडू…

 

 

Exit mobile version