Tuesday, July 2, 2024

Latest Posts

या पावसाळ्यात शरीराला तंदुरुस्त करण्यासाठी घ्या ‘हा’ सकस आहार..

या आजारांच्या आंदणामुळे व्हयरल फिव्हर, सर्दी , खोकला आणि पडसे यांचा आपल्या शरीरावर परिणाम दिसून येऊ लागला. त्यामुळे शरीर कमकुवत आणि अशक्त झाले. आपण आपले हे शरीर सुदृढ व निरोगी कसे ठेऊ शकतो याकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे असते.

लोक ज्या पाहुण्याची संपूर्ण मे महिन्यात फार आतुरतेने अगदी चातकासारखी वाट पाहत होतो  तो आपला विशेष पाहूणा जून च्या पहिल्याच दिवशी येऊन दारात ठेपला. तो पाहूणा म्हणजे पाऊस. ज्या वेळी पाऊस धरणीवर अवतरला त्यावेळी धरणीमातेला या उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. धरणीच्यामातेची तृष्णा शांत झाली. त्यांनतर मात्र या पाहुण्याने थोडी दिरंगाई केली आणि मध्ये-मध्ये बराच काळ त्याने थेट गैरहजेरी लावली आणि पुन्हा काही काळाने धोधो बरसू लागला. अशातच तो पाहूणा त्याच्या सोबत अनेक संसर्ग आजारांचे आंदण घेऊन आला. पाऊस हा जितका चांगला तितकाच वाईट  पण आहे. करणं पावसात भिजल्याने आपण आजारही पडू  शकतो.

या आजारांच्या आंदणामुळे व्हयरल फिव्हर, सर्दी , खोकला आणि पडसे यांचा आपल्या शरीरावर परिणाम दिसून येऊ लागला. त्यामुळे शरीर कमकुवत आणि अशक्त झाले. आपण आपले हे शरीर सुदृढ व निरोगी कसे ठेऊ शकतो याकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे असते. जस जसा पावसाळा सरतो आणि हिवाळा जवळ येऊ लागतो तसतसे व्हयरल इन्फेकशनचे प्रमाण अधिक वाढत जाते. या सर्व इन्फेकशन्स वर मात करण्यासाठी आपण आपला आहार विशेषत्वाने बदलून त्यात सकस व सुदृढ आहार घेणे गरजेचे बनते.

या आजारपणात भरपूर प्रथीनेयुक्त (Proteins) जेवण खाणे गरजेचे असते. अश्या गोष्टी खाव्यात ज्याने आपल्या शरीराला मजबुती आणि बळकटी  मिळते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. आपण असं बऱ्याचदा म्हणतो की अंडी आणि मांस यांच्यात ही शक्ती प्रचंड असते. हे खरेच आहे. परंतु जर तुम्ही शाकाहारी असाल तर त्यासाठी आपण दूध, दही, पनीर, तांदळाची पेज, डाळ, चणा आणि सोयाबीन खाऊ शकतो. त्याचसोबत ताजी फळे, पालेभाज्या यांचेही सेवन करू शकतो. या नेहमीच आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी परिणामकारक, गुणकारक असतात. यामध्ये विविध अँटीओक्सिडन्ट (Antioxidant) असतात जे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करतात. पालक, ब्रोकोली, गाजर, संत्री, मेथी, लिंबू, कोबी यांसारखे अनेक पदार्थ खाल्याने कोणत्याही प्रकारचे आजार आपल्याला घेर घालत नाही.

त्यात उत्तम असे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी! (Water) शरीरात जितकं जास्त पाणी जाईल तितके शरीरातील जंतू बाहेर जाण्यास मदत होते. यामुळे संपूर्ण शरीर स्वच्छ होते. तसेच हे पाणी शक्यतो गडू किंवा तांब्या यातूनच प्यावे जेणे करून त्यातली सकारात्मकता आपल्या शरीरात वसावी. आजच्या भाषेत सांगायचं झालंच तर शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. शरीरात जितके द्रव पदार्थ अधिक असतात तितके आजार लवकर बरे होतात. गरम हळदी टाकलेले दूध हे कोणत्याही वायरल इन्फेकशन वरील उत्तम पर्याय म्हणून याकडे पाहिले जातात. हे एकप्रकारचे आयुर्वेदिक औषधच आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर यात इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे संसर्गजन्य आजार दूर होतात. शिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे याने शरीराला कोणत्याही प्रकारची हानी पोहचली जात नाही.

त्याशिवाय शरीरातील रक्त योग्य प्रमाणात ठेवायचे असेल तर रोज सकाळी काहीही न खाता म्हणजेच अनशेपोटी रोज सकाळी १ ग्लास गाजर, बिट आणि आवळा यांचे रस मिक्स करून घ्यावेत. याने शरीराची कांतीसुद्धा चमकते, शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो, त्याचप्रमाणे डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. याने शरीर तंदुरुस्त, सुदृढ राहण्यास मदत होते. तर सर्वानी या सुखद पावसाळ्यात आणि हिवाळ्यात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची विशेष काळजी घेऊयात आणि हा पावसाळा व हिवाळा खूप एन्जॉय करू.

“संविधानात जे लिहिलंय त्या चौकटीत ते झालंच पाहिजे” ; PANKAJA MUNDE यांनी दिली प्रतिक्रिया

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss