डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेत आहेत ? पहा त्याचे दुष्परिणाम

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेत आहेत ? पहा त्याचे दुष्परिणाम

सध्याच्या काळात तंत्रज्ञानामुळे (Technology) आणि आधुनिक सुविधांमुळे (Modern Facilities) अनेक लोक बऱ्याच समस्यांचे समाधान स्वतःच शोधून काढतात. एका अर्थाने हे चांगलेच आहे. कारण तंत्रज्ञान अचूक माहिती देत आणि इंटरनेटच्या माध्यमामुळे सर्वच समस्यां सोडवणं अधिक सोपं झालं आहे. पण जेव्हा लोक हे त्यांच्या आरोग्या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटच्या साहाय्याने स्वतःच्या आजाराचा स्वतःच उपचार करतात. तेव्हा हा उपचार त्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतो. जर तुम्ही एखादी दुखापत झाली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनांच्या औषधाच्या (PainKiller) गोळ्यांचे किंवा अन्य कोणत्याही औषधांचे सेवन करत असाल तर काळजी घ्या. कारण यामुळे काय परिणाम होऊ शकतील हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

असे अनेक वेळा आढळते की, एखाद्या व्यक्तीला दुखापत झाली असल्यास ती व्यक्ती डॉक्टरकडे जाण्याऐवजी स्वतःचा उपचार स्वतःच करते आणि वेदनांच्या औषधांचे (PainKiller) सेवन करतात पण वेदनांच्या औषधांचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तेवढाच नाही तर त्यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो.

बद्धकोष्ठता (Constipation) : वेदनांच्या औषधाच्या अधिक सेवनाने तुम्हाला बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते. पण जर तुम्हाला बद्धकोष्ठता झाली असेल तर तुम्ही यावर मात करू शकतात. त्यासाठी पाण्याचे अधिक सेवन करा. आहारातील फायबरमध्ये वाढ करा म्हणजेच रोज फळे खा, आणि मध्यम व्यायाम करा या यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होऊ शकते

मळमळ (nausea): जर तुम्ही वेदनांच्या औषधांचे प्रमाणापेक्षा अधिकरित्या सेवन केले तर त्यानंतर एक किंवा दोन दिवसात तुम्हाला मळमळ किंवा उलट्या होण्याची शक्यता आहे.

निद्रानाश (Insomnia): वेदनांच्या औषधांचे जर जास्त प्रमाणात सेवन झाले. तर त्याचा परिणाम हा तुमच्या मेंदूवर होऊ शकतो त्यामुळे तंद्री किंवा झोप येऊ शकते. काही लोकांना असे आढळून येते की, वेदना कमी करण्यासाठी औषधे घेतल्यानंतर ते गोंधळलेले, विचलित किंवा फक्त शुद्ध हरपते होतात.

हे ही वाचा:

दक्षिण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का, प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुनील बाबू यांचे आकस्मिक मृत्यू

आई वडिलांच्या नावाला काळिमा, सख्या बापाने केला लैंगिक अत्याचार

Watch Video, रितेशच्या प्रश्नांच करीना कपूरने पहिल्यादांच दिल मराठीत उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version