Teacher’s Day 2023 Gift, यंदा शिक्षकदिनी आपल्या शिक्षकांना द्या ‘या’ भेटवस्तू

विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षक घडवतात. शिक्षक हे आपुल्या आयुष्यातले खूप मोठे मार्गदर्शक असतात. म्हणूनच ५ सप्टेंबरला शिक्षक दिन हा सर्वत्र साजरा केला जातो.

Teacher’s Day 2023 Gift, यंदा शिक्षकदिनी आपल्या शिक्षकांना द्या ‘या’  भेटवस्तू

विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षक घडवतात. शिक्षक हे आपुल्या आयुष्यातले खूप मोठे मार्गदर्शक असतात. म्हणूनच ५ सप्टेंबरला शिक्षक दिन हा सर्वत्र साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण (Former President of India Dr. Sarvapalli Radhakrishna) यांची जयंती म्हणून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्ण यांनी माझ्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा व्हावा अशी ईच्छा व्यक्त केली होती. म्हणून त्यांच्या ईच्छेनुसार भारतामध्ये ०५ सप्टेंबर ला शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ . सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तामिळनाडूच्या तिरुमानी गावामध्ये एका ब्राह्मण परिवारामध्ये झाला. त्यांना लहानपणापासून पुस्तके वाचण्याची खूप आवड होती. ते स्वामी विवेकानंद यांना खूप मानत होते. स्वामींच्या विचारांमध्ये ते प्रभावित झाले होते. डॉ . राधाकृष्ण यांचे निधन चेन्नई मध्ये १७ एप्रिल १९७५ रोजी झाले.

तर यंदाच्या वर्षी तुम्हाला देखील तुमच्या शिक्षणासोबत शिक्षक दिन साजरा करायचं असणार. परंतु शिक्षकांना नक्की काय भेटवस्तू द्यावी असा प्रश्न अनेकांना पडला असेल. म्हणूनच या खाली खास टिप्स.

हातानी बनवलेले ग्रीटिंग कार्ड – आपल्या आवडत्या शिक्षकांना आपल्या हातांनी बनवलेले ग्रीटिंग कार्ड द्या. तुमच्या मनांतील भावना त्या ग्रीटिंगमध्ये व्यक्त करा. त्यांनी आपल्याला कसे मार्गदर्शन केले त्यांचा थोडक्यात विश्लेषण त्या ग्रीटिंगमध्ये लिहा.

पेन – आपल्या अक्षर लिहायला शिक्षक शिकवतात. म्हणून तुम्ही आपल्या शिक्षकांना पेन म्हणून गिफ्ट देऊ शकता . पेन वर शिक्षकांचे नाव देखील लिहू शकतात.

फोटो फ्रेम – तुमचा शिक्षकांबरोबर असलेला फोटो तुम्ही फ्रेम करून तुमच्या शिक्षकांना देऊ शकता.

कॉफी मग – तुम्ही तुमच्या शिक्षकांना कॉफीचा मग भेट देऊ शकता. त्यावर तुम्ही तुमच्या शिक्षकांचे नाव आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

फुले – फुले आणि पुष्पगुच्छ तुम्ही शिक्षकांना शिक्षक दिनाच्या दिवशी देऊ शकता. गुलाबाचा पुष्पगुच्छ नक्कीच आवडेल.

चॉकलेट्स – चॉकलेट्स हा पदार्थ सर्वांना आवडतो. लहान व्यक्ती असो किंवा मोठी व्यक्ती असो. शिक्षक दिनी तुम्ही तुमच्या शिक्षकांना चॉकलेट्स गिफ्ट म्हणून देऊ शकता.

केक – शिक्षकदिनी तुम्ही तुमच्या शिक्षकांना केक बनवून देऊ शकता. त्या केक वर जुन्या आठवणी ला उजाळा दिला जात असेल तर अजून तुमच्या शिक्षकांना आवडेल.

पेंटिंग – शिक्षक दिनी तुमच्या जुन्या आठवणीतील पेंटिंग तुम्ही तुमच्या शिक्षकांना भेट म्हणून देऊ शकता.

हे ही वाचा:

जालन्यातील लाठीमारप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, दवेंद्र फडणवीस यांनी घेतली पत्रकार परिषद…

मुंबईमधील एअर हॉस्टेलची राहत्या घरी गळा चिरून हत्या…

चांद्रयान आणि सूर्यमोहिमेपेक्षाही कठीण आहे म्हाडाच्या मास्टरलिस्टची मोहीम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version