spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Teachers Day 2024: भारतात ५ सप्टेंबरलाच ‘शिक्षक दिन’ का साजरा केला जातो? जाणून घ्या सविस्तर…

शाळांमध्ये सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून डॉ. राधाकृष्णन यांचे स्मरण केले जाते आणि बरेच कार्यक्रम साजरे करून हा दिवस साजरा केला जातो.

शिक्षक दिन म्हणजेच टीचर्स डे जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जागतिक पातळीवर शिक्षक दिन दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. पण भारतात मात्र शिक्षक दिन वेगळ्या दिवशी साजरा केला जातो. आपल्याकडे ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. शिक्षक दिन हा आपल्या जीवनातील शिक्षक आणि गुरूच्या स्थानी असलेल्या व्यक्तींना आदर देण्यासाठी साजरा करतात. शाळांमध्ये सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून डॉ. राधाकृष्णन यांचे स्मरण केले जाते आणि बरेच कार्यक्रम साजरे करून हा दिवस साजरा केला जातो. पण शिक्षक दिन साजरा करण्यामागे त्याच इतिहास आणि महत्व याबद्दल जाणून घेऊया.

भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती भारतात शिक्षक दिन किंवा शिक्षक दिवस म्हणून साजरी केली जाते. ५ सप्टेंबर १८८८ रोजी तामिळनाडू येथे जन्मलेले डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती होते. ते एक विद्वान, तत्वज्ञ होते आणि त्यांना भारतरत्न पुरस्कारदेखील देण्यात आला होता. डॉ. राधाकृष्णन १९६२ मध्ये भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा काही विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. मात्र, डॉ. राधाकृष्णन यांनी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सांगितले. तेव्हापासून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

शिक्षक दिन हा समाजासाठी शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करतो. शिक्षक हे आपल्या देशाचा कणा आहेत आणि तरुण पिढीला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतात. भारतात शिक्षक-विद्यार्थी हे नातं सांस्कृतिक परंपरांमध्ये खोलवर रुजलेलं आहे. गुरु-शिष्य संबंध प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचा एक आधारस्तंभ आहे, जेथे आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून पूज्य आहेत. तर शिक्षक दिन हा समाजाचा शिक्षकांबद्दलचा आदर आणि कौतुक यावर जोर देऊन ही परंपरा प्रतिबिंबित करतो. तसेच शाळा आणि महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात. विद्यार्थी शिक्षकांना समर्पित नृत्य, गाणी नाटक आणि भाषणांसह सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss