spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

योगासने करण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या…

रोज योगासने करणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. योगासनामुळे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी निट होतो. तसेच शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत होते. तसेच काहीजणांना योगासने करायला खूप आवडतात. आजकालच्या तरुणपिढी साठी योगासने करणे खूप फायदेशीर आहे. नियमित योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. तुम्ही आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेवण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया योगासने करण्याची योग्य पद्धत.

हे ही वाचा: गरजेपेक्षा जास्त लवंगाचे सेवन करून नये, आरोग्यास हानिकारक ठरू शकते

 

ध्यान Meditation –

ध्यान करणे हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर मानले जाते. काही वेळ ध्यान लावून बसलात की तुमचे मन आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो. सकाळी उठल्यावर ध्यान केल्यामुळे तुमच्या मध्ये एकाग्रहता राहते. आणि ताण ताणतणावापासून देखील दूर राहतो.

नाडी शोधन प्राणायम Anulom Vilo

आपल्या शरीरातील अशुद्धी दूर करण्यासाठी योगामध्ये नाडी शोधन प्राणायम करण्यात येते. प्राणायमप्रमाणेच यामध्ये दीर्घ श्वास घेऊन सोडायचा असतो. हा एक प्रकारचा प्राणायाम सारखाच योगा आहे. तसेच या योगाचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत. तसेच तुम्ही प्राणायाम केल्यास तुम्ही श्वासावर नियंत्रण ठेऊ शकता.

 

शलभासन Shalabhasana-

काही लोकांना पाठ दुखी आणि कंबर दुखी असा त्रास असतो. तसेच हा त्रास महिलांना गरोदरपणानंतर तर हा त्रास जास्त प्रमाणात होतो. या आसनामुळे तुमच्या कंबर आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. त्या शिव्या देखील तुम्हाला पाठीचा आणि कंबरेचा त्रास होत असेल तर तुम्ही शलभासन हा योगासन करू शकता. यामुळे तुम्हाला खूप फायदे होतील.

भुजंगासन Bhujangasana-

जर तुम्हाला कंबर दुखी जास्त प्रमाणात होत असेल तर तुम्ही हे योगासन आवर्जून करा. यामुळे तुमची कंबर दुखी कमी करण्यास मदत होते. तसेच महिलांमध्ये गर्भाशयातील रक्ताभिसरण प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठीदेखील या आसनाची मदत होते. मेंदूचे कार्य सुरळीत चालणेही गरजेचे असते. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली राहते. स्मरणशक्ती वाढण्यासाठी सोपे उपाय यामध्येही काही खास आसनांचा समावेश असतो.

अर्धचक्रासन Ardha Chandrasana –

जर तुम्हाला मधुमेह हा आजार नियंत्रित ठेवायचा असेल तर तुम्ही अर्धचक्रासन केले पाहिजे. ज्या लोकांना हाडासंबंधी कोणतीही गंभीर तक्रार असेल, त्या व्यक्तींनी हे आसन करू नये आणि ज्या व्यक्तींना रक्तदाबाची समस्या अथवा मानसिक कोणताही आजार असेल त्यांनीही या आसनापासून दूरच राहणे. मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.

हे ही वाचा:

घरच्या घरी बनवा मसाला खिचडी

 

Latest Posts

Don't Miss