स्त्रियांमध्ये ‘या’ आजाराचा धोका जास्त आढळून येतो, जाणून सविस्तर माहिती

स्त्रियांमध्ये ‘या’ आजाराचा धोका जास्त आढळून येतो, जाणून सविस्तर माहिती

Silent Heart Attack च्या वाढत्या घटनांमुळे अनेकांना त्याची आपली चिंता वाटू लागली आहे. गेल्या दिवसात Silent Heart Attack च्या झटक्याने बहुतेक Celebrities ना आपला जीव गमवावा लागला आहे, या प्रकरणात मृत्यूचे कारण लगेच कळू शकत नाही की यामध्ये नेमकी लक्षणे कोणती? त्यामुळे तुम्हाला लक्षणे जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून सायलेंट हार्ट अटॅक या बद्दल सांगणार आहोत.

छातीत वेदना होणे ही सुरुवातीचे लक्षणे असू शकतात, बरेच लोकांना असे वाटते की छातीत या वेदना Acidity मुळे होतात. १० नोव्हेंबर २०१५ रोजी American Medical Association च्या Journal मध्ये एक संशोधन प्रकाशित झाले आहे. त्यानुसार ४५ – ८४ वर्ष या वयोगटातील सुमारे २००० लोकांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, सुरुवातीला कोणालाच हृदयविकाराचा धोका येत नव्हता.

 

बहुतेक लोकांवर संशोधन करण्यात आले त्यापैकी ८० टक्के असे लोक होते ज्यांना आपल्यावर कोणत्याही प्रकारचा Attack चा परिणाम झाला आहे, याची जाणीव देखील नव्हती, कारण तो एक प्रकारचा सायलेंट होता किंवा अगदी किरकोळ होता. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सायलेंट हार्ट Attack चा धोका जास्त जाणवतो लोक diabetes वर लक्ष देत नाही म्हणून त्याचा परिणाम नसांवर होतो.

एक संशोधनात असे आढळून आले आहे की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये Silent Heart Attack चा धोका जास्त जाणवतो. काही महिला असे असतात की ज्यांना वेदना सहन करण्याची क्षमता असते, म्हणून ते छोट्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. असे बहुतेक लोक आहेत की त्यांना हृदयविकाराच्या लक्षणांबद्दल माहित नाही. जसे छातीत दुखणे, छातीत जळजळ होणे, अपचन समस्या अशा समस्यांकडे दुर्लक्ष करतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते की, जर तुम्हाला छातीत दुखणे, किंवा अजून काही वेदना होत असतील तर तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे, आणि ECG चाचणी करून घेणे, Diabetes, obesity, high blood pressure, high cholesterol, smoking, बदलत्या Lifestyle मुळे अश्या समस्या जाणवतात.

 

हे ही वाचा:

८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version