Sunday, June 30, 2024

Latest Posts

मुलांचा छातीत बसलेला घट्ट कफ औषधांनीही कमी होत नाही..’हा’ उपाय करून पहा ; चुटकीत मिळेल आराम

लहान मुलांना वयाच्या ५ ते ७ वर्षापर्यंत सतत सर्दी, कफ, खोकला, ताप असे काही ना काही होतच असते. धुळीची ॲलर्जी, विविध विषाणूजन्य समस्या, बदलते हवामान अशा कारणांनी मुलांना या समस्या उद्भवतात. काही वेळा हा कफ ठराविक काळाने बरा होतो.

आरोग्यम्  धनसंपादा ।

आरोग्य हा आपला सर्वात महत्वाचा असा दागिना आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात प्रचंड त्रास हा शरीराला होत असतो. त्यात तो जर लहामुलांच्या आरोग्याचा प्रश्न असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे होऊन जाते. एकाद्या वेळेस मोठी माणस हा त्रास सहन करू शकतात, परंतु लहान मुले नाही. लहान मुलांना झालेला हा त्रास त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम करते. मुलांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी कसे राहू शकेल या प्रत्येक गोष्टीचा विहार पालक करत असतात. त्यांच्या पोटात उत्तम अन्न (hygienic food) जावं यासाठी प्रत्येक पालक सतत प्रयत्नशील असतो. आजच्या भाषेत बोलायचं झाल तर Health Conscious असतात.  

लहान मुलांना वयाच्या ५ ते ७ वर्षापर्यंत सतत सर्दी, कफ, खोकला, ताप असे काही ना काही होतच असते. धुळीची ॲलर्जी, विविध विषाणूजन्य समस्या, बदलते हवामान अशा कारणांनी मुलांना या समस्या उद्भवतात. काही वेळा हा कफ ठराविक काळाने बरा होतो. मात्र काही वेळा औषधोपचार आणि घरगुती उपाय करुनही हा घट्ट कफ छातीत तसाच राहतो. अशावेळी वाफारा, शेक देणे, गरम पाणी पिणे असे उपाय केल्यावर हळूहळू बरेच दिवसांनी यावर थोड्या प्रमाणात आराम मिळतो. पण या सगळ्या काळात मुलांची अजिबातच झोप होत नाही. कफ, सर्दी किंवा खोकला यामुळे त्यांना सतत जाग येत राहते आणि मग सलग झोप मिळत नाही. त्यांच्याबरोबरच आपल्याही झोपेचे खोबरे होते ते वेगळे.

दुसरीकडे कफामुळे अन्न जात नाही त्यामुळे अंगात ताकद राहत नाही. त्यात खेळणे सतत सुरू असल्याने थकवा येतो. असे सगळे झाले की मुलांच्या एकूणच आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होतो. या सगळ्यातून बाहेर यायला आणि पुन्हा नेहमीचे रुटीन सुरू व्हायला बराच वेळ लागतो. अशावेळी औषधांबरोबरच घरच्या घरी एक सोपा पारंपरिक उपाय केला तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. हा आयुर्वेदिक उपाय कोणता आणि तो कसा करायचा याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात 

यावर उपाय काय…?

  • खायचे पान म्हणजेच विड्याचे पान यावर अतिशय गुणकारी ठरते. या विड्याच्या पानाचा वेल आपण घरातही लावू शकतो किंवा पानाच्या दुकानात तर ही पानं अगदी सहज उपलब्ध असतात. 
  • मुलांच्या छातीला हलके मोहरीचे तेल लावून, विड्याची १ किंवा २ पानं तव्यावर थोडी गरम करायची आणि मुलांच्या छातीवर ही पानं ठेवून द्यायचे.
  • सकाळी उठल्यावर मुलांचा कफ पूर्णपणे निघून गेलेला आढळेल. तसेच यामुळे मुलांना रात्रभर गाढ झोप येण्यासही याची चांगली मदत होते.
  • २ वर्षाच्या आतल्या बाळांसाठी हा प्रयोग फायदेशीर ठरतो. पण मूल २ वर्षापेक्षा थोडे मोठे असेल तर विड्याचे १ पान कुटायचे त्यात वेलचीचे २ दाणे आणि थोडासा मध घालून ते मुलांना खायला लावायचे.
  • कफ निघून जाण्यासाठी विड्याचे पान अतिशय उपयुक्त औषध असून लहान मुलांनाही त्याचा खूप चांगला फायदा होतो.

हे ही वाचा

स्टेटबँक ऑफ इंडियाने SBI क्लार्क मेन्स एक्साम चे रिजल्ट जारी..

“आठवी पास असल्याचा मला अभिमान आहे ..” ; NARENDRA MEHATA यांनी दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss