‘या’ ५ फळांचा पुरुषांसाठी होतो मोठा फायदा… Heart Attack आणि Stroke वर ही होते मात!

तसेच द्राक्षांमध्ये प्लेटलेट्सना (platelets) मदत करणारे काही तत्व असतात. ज्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होत नाही आणि ब्लड फ्लो वेगाने होतो.

‘या’ ५ फळांचा पुरुषांसाठी होतो मोठा फायदा… Heart Attack आणि Stroke वर ही होते मात!

आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष देणे अजिबात शक्य होत नाही. पुरुषांचे जीवन हे प्रचंड धावपळीचे असते. म्हणूनच अनेक पुरुषांना धावपळीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. काही पुरुष हे स्वतःकडे लक्ष देऊन फिट दिसतात . तर काही पुरुष तर फिट नसतात म्हणून काही कारणे देताना आपण नेहमीच बघतो. आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. आणि याची अनेकांना कल्पना ही नसते. चुकीच्या जीवनशैलीमुळे जास्तीत जास्त पुरूषांना हाय ब्लड प्रेशरचा (Blood pressure) धोका निर्माण होण्याचा संभव असतो. ज्यामुळे कमी वयातच हार्ट अटॅक (Heart attack), स्ट्रोक (stroke) सारख्या आजाराचा धोका वाढतो.

वयाच्या सगळ्याच टप्प्यांवर पुरूषांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच पुरुषांनी दैनंदिन पौष्टिक आहारासोबतच ही ५ फळं खाणं गरजेचं आहे. ही फळं शरीराला आवश्यक पोषक तत्व तर देतातच सोबतच ब्लड सर्कुलेशनही (Blood circulation) वेगाने वाढवतात. त्याशिवाय पुरूषांची शक्ती सुद्धा वाढते. अलिकडे पुरूषांना सगळ्यात जास्त हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक, हार्ट फेल (Heart failure), किडनी डॅमेज (Kidney damage), नसा डॅमेज होणे (Nerve damage), तसेच लैंगिक (sexual problems)समस्यांचा सामना करावा लागतो. अशात जर या समस्या होऊ नये असं वाटत असेल तर खालील फळं नियमित खाणं अत्यंत गरजेचं आहे.

डाळिंब(Pomogranate)

डाळिंबामध्ये पलीफेनॉल अँटी-ऑक्सिडेंट (Anti-oxidant) आणि नायट्रेट (Nitrate) मोठ्या प्रमाणात असतं. डाळिंब खाल्ल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढतं तसेच मांसपेशीचे टिश्यू हेल्दी होतात. अनेक रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, व्यायाम करण्याच्या ३० मिनिटांआधी डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने नसा अत्यंत रिलॅक्स होतात.

 

रताळे (sweet potato)

रताळे आरोग्यासाठी फायदेशीर खूप मानले जातात. यातही अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट तत्व भरपूर असतात. तसेच यात नायट्रिक ऑक्साइड (Nitric oxide) असतं. जे नसांना मोकळं करून ब्लड सर्कुलेशन वेगाने करतं.

 

आंबट फळं

संत्री, लिंबू, चिंचा यांसारख्या आंबट फळांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि फ्लेवोनोइड्स (Flavonoids) असतात. जे नसांचं आकुंचन कमी करतात. याने ब्लड फ्लो वेगाने होतो. परिणामी हाय बीपीची समस्य होत नाही. याने पुरूषांना खूप फायदा मिळतो.

 

कलिंगड आणि द्राक्ष (watermelon & grapes)

कलिंगडाचे आरोग्याला एक नाही तर अनेक फायदे होतात. यात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. यात एक असंही तत्व असतं ज्याने नसा मोकळ्या होतात. तसेच द्राक्षांमध्ये प्लेटलेट्सना (platelets) मदत करणारे काही तत्व असतात. ज्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होत नाही आणि ब्लड फ्लो वेगाने होतो.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा:

कारल्याची भाजी खाल्यावर हे पदार्थ मुळीच खाऊ नका! आरोग्यावर होईल मोठा दुष्परिणाम…

Makhana Dosa कधी ट्राय केला आहे का? नसेल तर आता नक्कीच ट्राय करा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version