शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यामुळे या समस्या होतील

शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यामुळे या समस्या होतील

शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन फार गरजेचे आहे. यासाठी रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थाचा समावेश करावा. ज्यामध्ये जीवनसत्वे, फायबर , खनिजे आणि यांचा समावेश होतो. शरीरात जास्त प्रमाणात प्रथिने असल्यास त्वचा , स्नायू , डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच प्रथिने अनेक रोगांपासून संरक्षण करते. शरीर मजबूत ठेवण्यासाठी प्रथिने फार गरजेचे आहे. शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

हे ही वाचा : इम्यूनिटी मजबूत करायची असेल तर या टिप्स करा फॉलो

 

शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे तुम्ही अधिक कमजोर होतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषकतत्वांची गरज असते. प्रोटीन मुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते. तसेच प्रोटीन त्वचा, एन्झाईम्स आणि हार्मोन्ससाठी देखील खूप महत्वाचे आहे. तसेच शरीराच्या वाढीसाठी प्रोटीन देखील महत्वाचे आहे.

शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यामुळे हाडे कमकुवत होतात. तसेच जास्त प्रमाणात कमतरता असल्यामुळे हाडे खूप कमकुवत होतात आणि हाडे तुटण्याचा धोका जास्त असतो.

प्रोटीनच्या कमतरतेमुळे यकृतावरीही देखील गंभीर परिणाम होतो. ज्यामुळे शरीरातील चरबी वाढण्यास मदत होते. चरबी वाढल्यास फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. फॅटी लिव्हरमुळे अशक्तपणा जाणवतो, तसेच थकवा जास्त प्रमाणात येतो, आणि पोटाच्या खालच्या भागात दुखणे चालू होते.

 

बदलत्या ऋतूमुळे आपल्याला अनेक संसर्ग होतात. पण शरीरात संसर्ग वारंवार होत असल्यास शरीरात प्रोटीनची कमतरता जाणवते. प्रथिनेच्या कमतरतेमुळे आपली शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होण्यास मदत होते.

शरीरात लाल रक्त पेशी कमी झाल्यास बीपीचा त्रास होतो. आणि थकवा जाणतो. याला ॲनिमिया असे म्हणतात.

शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यामुळे आपल्याला जास्त भूक लागते.

जर शरीराला पुरेसे प्रोटीन मिळत नसेल तर नखे कमकुवत होऊ शकतात. आणि केस गळती देखील होऊ शकते.

जखम बरी होण्यास जर जास्तज वेळ लागत असेल तर शरीरात प्रोटीनची कमतरता असू शकते.

हे ही वाचा :

चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी, जाणून घ्या तुरटीचे फायदे

 

Exit mobile version