पावसाळ्यात प्रत्येकाने सोबत ठेवाव्यात अशा काही महत्त्वाच्या वस्तू

पावसाळ्यात जर न भिजता किंवा कमी भिजता कोणत्याही शहरातून किंवा गावातून बिनधास्त प्रवास करायचा असेल तर, तुम्हीसुद्धा सोबत ठेवा या वस्तू

पावसाळ्यात प्रत्येकाने सोबत ठेवाव्यात अशा काही महत्त्वाच्या वस्तू

प्रत्येक माणूस जसा आपल्या इच्छांची बकेटलिस्ट तयार करतो, एखादी कामात व्यस्त असणारी व्यक्ती आपल्या कामाची यादी तयार करते. त्याचप्रमाणे, पावसाळ्यात जर न भिजता किंवा कमी भिजता कोणत्याही शहरातून किंवा गावातून बिनधास्त प्रवास करायचा असेल तर तुम्हीसुद्धा पावसाळ्यात स्वतःची काळजी घेण्यासाठी खालील गोष्टींची यादी लक्षात ठेवली पाहिजे आणि पाळली देखील पाहिजे:

रिव्हर्सिबल छत्री: उलटी उघडणारी आणि जराही पाणी न गळू देणारी ही रिव्हर्सिबल छत्री आपल्या नेहमीच्या छत्र्यांपेक्षा जरा वेगळी आहे. ही छत्री आकाराने मोठी असते. तसेच तिच्या उलट बंद होण्याच्या वैशिष्ट्यामुळे ही छत्री आपण सहजपणे कोठेही नेऊ शकतो.

रेनकोट: मुसळदार पडणाऱ्या पावसापासून वाचवण्यासाठी फक्त एक छत्री ही केव्हाच पुरेशी नसते. त्यामुळे कोटाच्या आकाराचे एखादे रेनकोट नेहमी सोबत ठेवावे.

इमरजन्सी लाईट्स: सतत कडाडणाऱ्या विजा आणि मुसळधार पडणारा पाऊस यामुळे कधीही कुठेही लाईट जाऊ शकते आणि पावसाळ्यात लाईट जाण्याचे प्रमाण अजून वाढते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पावसाळी यादीत इमरजन्सी लाईट आवर्जून ॲड करायला हवी.

स्मार्टफोन कवर: पावसाळ्यात झिप लॉक बॅग वापरण्यापेक्षा गळ्यातील पट्टा आणि आर्मबँड सह येणारे वॉटरप्रुफ कवर पावसाळ्यात तुम्हाला तुमचा मोबाईल निरोगी ठेवण्यास मदत करेल.

वॉटरप्रुफ बॅग कवर: पावसाळ्यात छत्री आणि पाठीवरची बॅग एकाचवेळी सांभाळणे म्हणजे जणू तारेवरची कसरत केल्यासारखे आहे. त्यामुळे जर या पावसाळ्यात तुम्हाला तुमची बॅग चिंब भिजण्यापासून वाचवायची असेल तर वॉटरप्रुफ बॅग कवर नक्की विकत घ्या.

वॉटरप्रुफ पाकीट आणि पॉवरबँक: वॉटरप्रुफ पाकीट आणि पॉवरबँक ह्या दोन वस्तू पावसात प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने विकत घ्याव्यात. कारण वॉटरप्रुफ पाकीट तुमचे पैसे सुरक्षित ठेवते तर, पॉवरबँक तुमच्या मोबाईलला जीवनदान डते ज्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्तपणे पावसात फिरू शकत, प्रवास करू शकता.

 

Exit mobile version