spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वजन कमी करायचा विचार करताय ? पण भुकेवर नियंत्रण नाही तर, हे आवश्क वाचा

वजन कमी करण्यासाठी तुमचा आहार खूप महत्वाचा आहे.

वजन कमी करण्यासाठी तुमचा आहार खूप महत्वाचा आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही जास्त फायबर असलेले पदार्थ खा.भरपूर फायबर असलेले पदार्थ तुम्हाला पोट भरून ठेवण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी झुंबा, एरोबिक्स आणि पोहणे हे चांगले पर्याय आहेत. जेवण वेळेवर करा जेवणाची वेळ चुकू नका. वजन कमी करण्यासाठी फास्ट फूड च सेवन करू नका. सकाळी उठल्यावर नियमितपणांनी व्यायम,योगासने करणे.आपल्या शरीरात अतिरिक्त ऊर्जा साठणार नाही याची काळजी घेणे.सकाळचा नाश्ता पोटभर करावा.वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. शिळे अन्न आणि जास्त शिजवले अन्न न खाणे. चहा कॉफी टाळणे आणि ग्रीन टी चे सेवन करणे. याशिवाय गोड पदार्थ ही योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. समतोल आहार व पुरेशी शांत झोप घेणे ही पथ्ये पाळावी लागतात. उपाशी राहू नये तर योग्य आहार घेऊन वजन कमी करता येते.तर आज आपण जाणून घेऊया काही टिप्स .

हे ही वाचा :फिल्मफेअर पुरस्कार २०२२ : विजेत्यांच्या नावाची यादी आली समोर

बदाम : भूक लागल्यानंतर बदाम चे सेवन करा. बदाम खाल्याने फायबर मिळते. प्रोटीन आणि फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यानं तुमचं पोट भरलेलं राहतं आणि जास्त वेळ भूक लागत नाही. बदामामध्ये प्रथिने असतात जे पातळ स्नायूंच्या वाढीस मदत करतात. त्यामध्ये निरोगी चरबी देखील असतात जे संपूर्ण बॉडी मास इंडेक्स राखण्यास आणि कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमचे पोटातील वजन कमी होते. त्यामुळे, जर तुम्हाला तुमचे पोट वाढण्याची भीती वाटत असेल, तर बदाम घ्या आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा खा.

भाज्यांचा रस : वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या भाज्यांचा रस पिणे गरजेचं आहे. भाज्यांचा भूक शांत करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.भाज्यान मुळे शरीराला योग्य पोषण मिळते. कोबीचा रस,गाजराचा रस,काकडीचा रस,कारल्याचा रस,टोमॅटोचा रस,दुधीचा रस,पालकाचा रस,बीट रस इत्यादीचा वापर करू शकता. वजन कमी करण्यासाठी.

संतुलित आहार घेणे : आपल्या शरीराला निरोगी आणि कार्यक्षम राहण्यासाठी विविध प्रकारच्या घटकांची आवश्यकता असते. कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, फॅट्स् तसेच क्षार आणि खनिजद्रव्ये हे ते घटक होत. हे सर्व घटक आपल्या शरीराचे योग्य प्रकारे पोषण करण्यासाठी आवश्यक असतात आणि ते फक्त अन्नातूनच आपल्याला मिळत असतात.त्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.

ताक : भूक भागवण्यासाठी तुमि ताक पिऊ शकता. ताक दुपारी जेवल्यानंतर पिणे ज्यामुळे पोट थंड राहते. ताकामधील कॅल्शियम आणि प्रथिनांमुळे जास्त वेळ भूक लागत नाही.

योग्य प्रमाणात खाणे : जेवण योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. आपल्या शरीराला जितकी गरज आहे तितकेच खाणे गरजेचे आहे. शरीराच्या गरजेपेक्षा जराही जास्त न खाणे किंवा गरजेपेक्षा थोडेसुद्धा कमी न खाणे म्हणजे शरीराचे योग्य प्रकारे पोषण करणे होय.

हे ही वाचा :

फिल्मफेअर पुरस्कार २०२२ : विजेत्यांच्या नावाची यादी आली समोर

Latest Posts

Don't Miss