हा पक्षी वर्षातून फक्त एकदाच पाणी पितो, आहे तरी कोण ?

पण भारतात असा एक अनोखा पक्षी आहे की जो फक्त पावसाच्या पहिल्या थेंबाने त्याची तहान भागवतो. हा पक्षी फक्त पावसाचा पहिला थेंब पितो.

हा पक्षी वर्षातून फक्त एकदाच पाणी पितो, आहे तरी कोण ?

पृथ्वीवरच्या सर्व सजीवांना जगण्यासाठी अन्न आणि पाणी या दोन्हींची गरज असते. या दोन्हींशिवाय जगणे अशक्य आहे. काही सजीव तर फक्त पाणी पिऊन जगतात. पण भारतात असा एक अनोखा पक्षी आहे की जो फक्त पावसाच्या पहिल्या थेंबाने त्याची तहान भागवतो. ‘चातक’ हा भारतातील भाग्यवान पक्षांपैकी एक आहे. या पक्षाला जॅकोबिन कोकीळ असेही म्हटले जाते. चातक हा पक्षी वर्षातून फक्त एकदाच पाणी पितो. हा पक्षी फक्त पावसाचा पहिला थेंब पितो असे भारतीय साहित्यात नमूद केले आहे. तसेच हा पक्षी मान्सूनच्या आगमनाचीही माहिती देतो.

चातक हा पक्षी प्रामुख्याने उत्तराखंडमध्ये आढळून येतो. तसेच तो बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील सरैयमान पक्षी अभयारण्यासह वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातही पाहिला गेला आहे. चातक पक्षाच्या या गोष्टींबद्दल तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल.चातक वर्षातून एकदाच पाणी पितात. एकदा पाणी प्यायल्यानंतर काहीही झाले तरी ते पुन्हा पाणी पीत नाही. या पक्ष्याला भांड्यात पाणी दिले तरी ते पाणी पिणार नाही. पावसाशिवाय ते इतर कोणत्याही स्त्रोताचे पाणी पीत नाही.

चातक हा पक्षी आकाराने मैनेएवढा असतो. त्याचा रंग काळा-पांढरा असून माथ्यावर हिरवट तुरा असतो. डोळ्याची बाहुली तपकिरी किंवा लालसर तपकिरी, चोच काळी आणि पाय आणि नखे गडद असतात. भारतात चातकच्या प्रामुख्याने दोन प्रजाती आढळून येतात. हा पक्षी स्वतःचे घरटे बनवत नाही किंवा पिल्ले पाळत नाही. त्यामुळे हा पक्षी आपली अंडी इतर पक्ष्यांच्या घरट्यात जन्माला घालतो. चातक पक्षी हा प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडातील पक्षी आहे.

हे ही वाचा:

जीन्स जर का अधिकप्रमाणात लांब असेल तर ‘या’ पद्धतीने फोल्ड करुन असा करा फॅशनबल लुक …

कासवांमध्ये नेमकं काय असतं, की त्यांची तस्करी केली जाते? आणि कोणत्या कासवांची आहे जास्त डिमांड…?

BIG BOSS OTT winner एल्विश यादवबद्दल आलिया म्हणाली …

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version