रोजच्या आहारातील “या” पदार्थामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक

रोजच्या आहारातील “या” पदार्थामुळे येऊ शकतो हार्ट अटॅक

आजकालच्या धावपळीमुळे आपल्याला आरोग्यावर लक्ष देता येत नाही . आपण जास्त प्रमाणात बाहेरील पदार्थ सेवन करतो . हृदयाशी संबंधित आजारांचा धोका झपाट्याने वाढत आहे . आता या आजाराला वृद्धच नाही तर लहान मुले देखील बळी पडायला लागले आहे . (WHO) world health organization यांच्या अहवालानुसार जगभरात सर्वाधिक मृत्यू हृदयविकारामुळे होतात. हृदयविकाराचा झटका ही एक सामान्य समस्या झाली आहे . हृदयविकाराचा झटका जेव्हा येतो त्यावेळी हृदयाच्या स्नायूंच्या एका भागाला पुरेसे रक्त मिळत नाही. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून जास्त करून घरातील पदार्थ खाणे . हृदयाच्या संबंधित आजरांमुळे दरवर्षी सुमारे १७. ९ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो . हृदयाशी संबंधित आजारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो.

हे ही वाचा : स्वयंपाकात गॅसचा जास्त वापर केला जातो ? गॅस वाचविण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

 

काही गोष्टी ह्रदयाला निरोगी ठेवतात . तर काही गोष्टी परिणाम घातक ठरू शकतात. जर हृदय निरोगी ठेवायचे असेल तर रोज नियमित पणे व्यायाम केला पाहिजे. आहारामध्ये घरगुती पदार्थांचा समावेश केला पाहिजे . आहार वेळोवेळी घेतला पाहिजे आणि काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे . हे सर्व केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो .

कमी कॅलरी आणि पोषक तत्वांनी युक्त असलेले फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाणे . फास्ट फूड पासून लांब राहणे . आणि उच्च सोडियम पदार्थापासून लांब राहणे .

 

आहारात मिठाचे प्रमाण कमी करा . जास्त प्रमाणात मीठ वापरल्यास उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो . ते हृदयविकाराचे कारण असू शकते .

फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात जीवनसत्वे असतात . फळ भाज्यांन मध्ये देखील कॅलरीज आहेत . अधिक फळे आणि भाज्यांचे सेवन करून , आपण आपल्या नियमित आहारातून उच्च-कॅलरी अन्न जसे की मांस, चीज आणि स्नॅक पदार्थ कमी करू शकता.

सोडा आणि कोल्ड्रींक या साखरयुक्त पेय पासून लांब राहणे . यामुळे हृदयविकाराचा झटका आणि मधुमेह या सारखे आजारास आपण बळी पडतो . हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही या गोष्टी पासून लांब राहणे गरजेचे आहे .

जास्त प्रमाणात केक , पेस्ट्रीज खाऊ नये . तुम्ही स्वयंपाकाचे तेल बदले पाहिजे . स्वयंपाकासाठी तेलाचा वापर कमी करा .

हे ही वाचा :

घरच्या घरी बनवा त्वचेसाठी कॉफीचा फेस पॅक

Exit mobile version