प्रत्येकवेळी छातीत होणारी जळजळ,आंबट ढेकर होण्यामागे हे असू शकत कारण.

प्रत्येकवेळी छातीत होणारी जळजळ,आंबट ढेकर होण्यामागे हे असू शकत कारण.

चांगली पाचन क्रिया म्हणजे प्रकृती चांगली राहणें . आपल्या शरीराची पाचन क्रिया बिघडली,तर त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. प्रत्येकवेळी आंबट ढेकर,छातीत जळजळ होण्यामागे काय कारण असू शकतात. चला पाहूया
चांगली प्रकृती तंदुरुस्ती राहण्यासाठी चांगली पाचन क्रिया राहणे गरजेचे आहे. खराब पाचन क्रियांमुळे संपूर्ण आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ज्यावेळी खाणं व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे आपण जे अन्न खातो त्या आन्ना मधील काही पोषक तत्व सुद्धा शरीराला पूर्णपणे मिळत नाही. खराब पचनक्रियामुळे आरोग्यासंबधी अनेक समस्या समोर येतात. काही लोकांना सतत ऍसिडिटी होत असते. त्यामुले आंबट ढेकर, छातीत होणारी जळजळ अश्या समस्या निर्माण होतात. जर, नेहमीच असा त्रास होत असेल, तर काही गोष्टीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

आपल्या पोटात आधी पासून ऍसिड असते. खाणं पचवण्यात हे ऍसिड मदत करत. पण काही चुकांमुळे शरीरालामधील ऍसिडच प्रमाण वाढत. त्यामुळे छातीत होणारी जळजळ,आंबट ढेकर येऊ लागतात. काहीवेळा औषधाचं सेवन आणि प्रग्नेंसीमुळे सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते. जर ऍसिडिटी सतत होत असेल,तर यामागे काय कॉमन कारण आहे हे जाऊन घेऊया.

ऍसिडिटी का चाळवते :
जे काही आपण खातो ते पचवण्यासाठी फिजिकल ऍक्टिव्हिटी आवश्यक आहे. जर जेवल्यानंतर तुम्हाला बसून राहण्याची किंवा झोपून जाण्याची सवय असेल, तर त्यामुळे सुद्धा ऍसिडिटी चाळवू शकते.

रात्री जेवल्यानंतर काय टाळलं पाहिजे?
तुम्ही जर जेवल्यानंतर लगेच चहा-कॉफी पीत असाल,तर ऍसिड रिफलक्सची समस्या निर्माण होऊ शकते. खासकरून रात्री जेवल्यानंतर चहा-पाणी पिणं टाळा.

ऍसिड रिफलक्स
रात्री ऍसिड रिफलक्स होण्यामागे दोन कारण असू शकतात. एक उशिरा जेवण आणि त्यानंतर लगेच झोपणं. दुसरं चुकीच्या पोजीशनमध्ये झोपणं. रात्री पोटावर झोपल्यास ऍसिड रिफलक्सचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.

ऍसिडिटी का वाढते?
खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्याचा थेट परिणाम आपल्या पचनावर होतो. बाहेरील जास्त जंक फूड,मसालेदार तळलेल खाणं,जास्त चहा-कॉफीच सेवन अशा गोष्टीमुळे सुद्धा ऍसिडिटी वाढते.

हे ही वाचा:

वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक, परिवहन विभागाचे आवाहन

ठाकरे गटाला शिंदे गटाकडून पुन्हा मोठा धक्का; धाराशिवचा हा नेता करणार शिंदे गटात प्रवेश

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version