Thursday, July 4, 2024

Latest Posts

मोठे कानातले घालायला आवडतात? मग या Tips नक्की फॉलो करा

कोणताही सण समारंभ असो किंवा एखादे लग्न व कार्यक्रम असो कोणत्याही कपड्यांवर मोठे-मोठे लांबलचक कानातले घातले की आपला लूक खुलून दिसतो. मोठे कानातले घातले की इतर कोणतीही ज्वेलरी नाही घातली तरी चालते. वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या कानातल्यांमध्ये आपण एकदम हटके आणि स्टायलिश लूक मिळवू शकतो. वेस्टर्न कपड्यांवरही आपण हेवी कानातले कॅरी करू शकतो. मात्र या हेवी कानातल्यांचा कानाला त्रास होणार नाही याची आवर्जून काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी मोठे असले तरी हलक्या वजनाचे कानातले निवडणे, हे कानातले जास्त वेळ कानात राहणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. आज आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही मोठे कानातलेही आरामात घालू शकता आणि कानही दुखणार नाही.

जड कानातले घालताना लक्षात ठेवा…

  • बाजारामध्ये कानातल्यांसाठी आरामदायी सपोर्ट पॅच अगदी सहज मिळतात. हे पॅच पारदर्शक आणि मऊ असतात. हे पॅच झुमक्यासारख्या मोठ्या कानातल्यांसाठी आधार ठरतात. यामुळे कानातल्यांचा भार कानाच्या छिद्रावर येत नाही तर हे सपोर्ट पॅच दिसूनही येत नाही. त्यामुळे झुमके घेणार असाल तर सपोर्ट पॅचचा वापर करायला विसरू नका.
  • कानातले खूप जड असतील तर त्या कानातल्यांना शोभतील असे वेल घ्या. हे वेल कानाच्या पुढच्या भागातून सुरु होणारे आणि वर जाऊन कानाच्या मागच्या भागात अडकणार असावेत. यामुळे कानातल्यांचा भार वेलावर जातो आणि तो छिद्रावर येण्याऐवजी कानाच्या वरच्या भागावर पडतो. मात्र हे वेल वजनाला हलके असावेत. कानातल्यांना एखादा वेल लावणे जेणेकरून कानावर कानातल्यांचा भार येणार नाही आणि स्टायलिश लूक कॅरी करू शकता.
  • सध्या बाजारात असे अनेक प्रकारचे कानातले उपलब्ध आहेत जे दिसायला तर अतिशय जड वाटतात. पण प्रत्यक्षात ते वजनाने खूप हलके असतात. जड कानातले घालून कानांना दुखापत करून घेण्यापेक्षा असे कमी वजनाचे कानातले शोधून घालणे कधीही चांगले.
  • अनेकदा जड कानातले जेव्हा जास्त वेळ कानात ठेवतो तेव्हा कानातले काढताना कानाच्या छिद्रातून पाणी येण्याचा त्रासही होतो. कानाच्या छिद्राला आणि त्याच्या आसपासच्या जागेला खूप खाज येऊन फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. शक्यतो जड कानातले घालताना दिलेल्या टिप्सचा वापर करा अन्यथा शक्य होईल तेव्हा जड कानातले घालणे टाळा.

हे ही वाचा :

जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा आरोप, वर्ल्ड कपच्या नावाखाली…

Gharat Ganapati चित्रपटात निकिताचा मराठमोळा अंदाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss