Saturday, July 6, 2024

Latest Posts

Tips For Rainy Season: पावसाळ्यात ‘या’ गोष्टी चुकुनही करू नका

पावसाळ्यात वातावरण थोडे थंड असल्यामुळे विशेष करून आपल्या कपड्यांकडे लक्ष देणे आवश्यक असते. आपल्याला अशा प्रकारचे कपडे घालयाला हवे जे आपल्या त्वचा व आरोग्यासाठी सुरक्षित आणि आरामदायी असू शकतात. हवामान बदलानुसार आपण जशी त्वचेची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्या कपड्यांची शैलीही बदलली पाहिजे. आपण कपडे हे ऋतूनुसार खरेदी केले पाहिजे.

पावसाळ्यात वातावरण थोडे थंड असल्यामुळे विशेष करून आपल्या कपड्यांकडे लक्ष देणे आवश्यक असते. आपल्याला अशा प्रकारचे कपडे घालयाला हवे जे आपल्या त्वचा व आरोग्यासाठी सुरक्षित आणि आरामदायी असू शकतात. हवामान बदलानुसार आपण जशी त्वचेची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्या कपड्यांची शैलीही बदलली पाहिजे. आपण कपडे हे ऋतूनुसार खरेदी केले पाहिजे. पावसाळा ऋतूमध्ये मऊ फॅब्रिकचे कपडे घालावेत. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सुती कपडे घालणे आरामदायी ठरते. आपल्याकडे अनेक प्रकारचे आणि रंगाचे कपडे असतात. पण पावसाळ्यात नेमकी कोणते कपडे घालावे याची योग्य ती निवड करत येत नाही. पावसाळ्यात कपडे सतत ओले असतात. कपडे ओले असल्यामुळे त्यातून कुबट असा वास येत राहतो. तसेच ओले कपडे घातल्याने त्वचेला खाज आणि पुरळ येऊ शकते. कपडे ओले असल्यामुळे बाहेर जाताना नेमकी कोणते कपडे घालावे हा सतत पडणारा प्रश्न असतो.

सध्या बाजारात शिफॉन, जॉर्जेट, पॉलिस्टर, सिल्क, रेयॉन असे अनेक प्रकारचे कपडे मिळतात. यातले सिल्क सोडले तर बाकी प्रकारचे कपडे सहज बाजारात मिळतात. त्यामुळे बऱ्याचदा ते आपण घेण्यास प्राधान्य देतो. पण या कपड्यांमुळे आपल्याला त्वचेचे आजार होऊ शकतात, खासकरून ज्यांची त्वचा सेंसेटिव्ह आहे. या कपड्यांमुळे बरेच आजार जडू शकतात. हे आजार खूप गंभीर नसले तरी ते पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकतात. पावसाळ्यात शक्यतो कॉटनचे कपडे वापरण्याचा सल्ला आरोग्यतज्ञ् दिला जातो. कॉटनचे कपडे हे अतिशय मऊ आणि आरामदायी असतात. कॉटनच्या कपड्यांमध्ये आपल्या शरीरामध्ये हवा खेळती राहते. जवळपास कॉटनचे कपडे वापरण्यास सर्वानी प्राधान्य दिले पाहिजे. ज्यांची त्वचा खूप संवेदनशील प्रकारात मोडते  त्यांच्यासाठी सुती कपडे घालणे योग्य आहे. पावसाळ्यात नेमकी कोणत्या फॅब्रिकचे कपडे परिधान करणे टाळावे याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.

  • मखमली कपडे हे दिसायला अतिशय स्टाईलिश असतात. पण पावसाळी किंवा उन्हाळी  हवामानात ते घालणे टाळले पाहिजे. मखमली कपडे हे वजनाला जड असतात. ते एकदा भिजले की लवकर सुकत नाही. म्हणून पावसाळ्यात ते घालणे टाळावे.
  • सिल्कचे कपडे, साड्या याचा ट्रेंड कधीच सुटत नाही. हे कपडे दिसायला हलके असता पण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सिल्कचे कपडे घालणे टाळावे. या कपड्यांवर घामाचे आणि पाण्याचे पांढरे डाग पडतात आणि ते सहज जात नाही. विशेषतः घामाचे डाग लवकर निघत नाही. त्यामुळे पावसाळ्यात सिल्कचे कपडे घालू नये.
  • पावसाळ्यात लेदरचे कपडे आणि लेदरपासून बनवलेल्या वस्तू वापरू नये. कारण या वस्तू पाण्यामुळे खराब होतात. जर या वस्तू पावसाळ्यात वापरल्या  तर त्या लवकर खराब होण्याची शक्यता असते.
  • डेनिम फॅब्रिक हे नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. मग तो कोणतापण ऋतू असो. पण पावसाळ्यात डेनिम घालणे टाळले पाहिजे. तसे पाहता डेनिम हे घालण्यास मऊ आहे. पण त्याचे फॅब्रिक पाण्यात किंवा घामाने भिजल्यानंतर जड होते. यामुळे त्वचेवर जळजळ, रॅशेससारख्या समस्या होतात. म्हणून डेनिम फॅब्रिक घामाने शक्यतो टाळले पाहिजे.
  • शिफॉन आणि जॉर्जेटसारखे पातळ आणि पूर्णपणे फिकट कपडे घालू नये. कारण हे कपडे थोड्या पावसात भिजले की लगेच खराब होतात आणि त्याचा रंगही खराब होतो. म्हणून पावसाळयात हलके आणि पातळ कपड्यांपासून दूर राहा.

    हे ही वाचा

    शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, Vinayak Raut यांचा Narayan Rane यांना टोला

    Follow Us

    टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss