Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Tips For Rainy Season: पावसाळ्यात कपडे वाळत नाहीत, मग काय करायचं?

बाहेर जोरदार पाऊस पडत असताना कपडे सुकायला कुठे घालायचे हा एक मोठा प्रश्न असतो. आज आम्ही या समस्येवर काही उपाय सांगणार आहोत. या उपायाद्वारे पावसाळ्यातही तुम्हाला तुमचे कपडे सुकवणे सोपे होईल.

जून महिना आला की पावसाचा काही अंदाज नसतो. पावसाचे प्रमाण हे कधी जास्त तर कधी कमी असते. पावसाळा तर सर्वानाच आवडतो. पण पावसाळ्यात सर्वात मोठी काळजीची बाब म्हणजे कपडे सुकण्याची. बाहेर जोरदार पाऊस पडत असताना कपडे सुकायला कुठे घालायचे हा एक मोठा प्रश्न असतो. त्यात मुंबईसारख्या दमट हवामान असलेल्या ठिकाणी तर ही एक समस्याच आहे. बाहेर पाऊस पडत असताना घरात कपडे वाळत घातले तरी त्याला एक उग्र,आंबट वास लागतो आणि कपड्यांना दुर्गंधी येते. तसेच त्यामध्ये जंतूही तयार होतात. आज आम्ही या समस्येवर काही उपाय सांगणार आहोत. या उपायाद्वारे पावसाळ्यातही तुम्हाला तुमचे कपडे सुकवणे सोपे होईल.

पावसाळ्यात कपडे सुकण्यासाठी वापरायच्या काही खास टिप्स:

  • पावसाळ्यात कपडे बाहेर सुकायला घालणे अनेकदा शक्य होत नाही अशावेळी घरात कपडे वाळत घालताना शक्यतो पंख्याचा वापर करावा.
  • कपडे धुण्यासाठी एकतर आपण वॉशिंग मशीनचा वापर करतो नाहीतर हाताने धुतो. वॉशिंग मशीनमध्ये ड्रायरचा पर्याय असतो. मात्र हाताने धुताना कपडे व्यवस्थित पिळून शक्य तितके पाणी काढून घेणे गरजेचे आहे. कारण पाणी शिल्लक राहिल्यास कपडे नीट सुकत नाही आणि कपड्यांना आंबट वासही येतो.
  • आपण घरामध्ये कपडे गॅलरीत किंवा दोऱ्यांवर वळत घालतो. कधी कधी कपडे वाळत घालताना एकावर एक असे वाळत घातले जातात. पावसाळ्यात अशा पद्धतीने वाळत घातलेले कपडे सुकत नाही. अशावेळी अधिकच्या दोऱ्याची सोय करून घ्या. जर हे शक्य नसेल तर धुतलेले कपड्यांसाठी क्लॉथ स्टॅन्ड किंवा हँगरचा वापर करू शकता. यामुळे कपडे एकाचवेळी अनेक कपडे वाळवले जाऊ शकतात.
  • जर तुम्हाला घाईघाईने कुठे जायचे असेल आणि कपडे ओलसर असतील तर तुम्ही कपडयांवरून गरम इस्त्री फिरवू शकता.
  • घरात कपडे वाळत घालताना घराचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवा. यामुळे कपड्याचा ओलसरपणा कमी होण्यास मदत होईल.
  • पावसाळ्यात कपडे घालण्यासाठी निवड करताना चांगल्या दर्जाचे कॉटनचे कपडे, शिफॉन, पॉलिस्टर, जोर्जेट अशा कपड्यांची निवड करावी. अशा प्रकारचे कपडे पावसाळ्यात लवकर सुकतात. तुलनेने जाड कॉटन, डेनिमचे कपडे लवकर सुकत नाही.

पावसाळ्यात अशा प्रकारच्या टिप्सचा वापर केला तर तुम्हाला कपडे सुकण्यासाठी नक्कीच मदत होईल.

 

हे ही वाचा

Monsoon Session साठी खबरदारी घेऊन पूर्वतयारी करण्याच्या Neelam Gorhe यांच्या सूचना

 

Gharat Ganpati: गोष्ट कुटुंबाची,आपल्या लाडक्या बाप्पाची ! लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss