Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Tips For Rainy Season: पावसाळ्यात उपयोगी येणाऱ्या छत्रीची काळजी कशी घ्यायची?

जोरदार पावसात आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकदा छत्रीमध्ये बिघाड होतो. त्यामुळे छत्रीची निगा राखणे खूपच महत्वाचे आहे.

पावसाळा आला की सर्वांची तारांबळ उडते ती पावसापासून स्वतःचे रक्षण करण्याची. पावसापासून रक्षण करण्यासाठी छत्री हे एक महत्वाचे साधन आहे. जोरदार पावसात आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकदा छत्रीमध्ये बिघाड होतो. त्यामुळे छत्रीची निगा राखणे खूपच महत्वाचे आहे. अनेकदा एक पावसाळा एका छत्रीत निघूच शकत नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र, योग्य पद्धतीने छत्रीची काळजी घेतली तर एक पावसाळा तुम्ही एकाच छत्री वापरून काढू शकता. ऐन पावसात छत्री खराब होऊन पंचाईत होण्यापेक्षा वेळे अगोदरच काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. ही खबरदारी काय आहे हे थोडक्यात माहिती करून घेऊया. 

  • छत्री विकत घेताना त्याचा टिकाऊपणा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बाजारात असलेल्या स्वस्त दरातील, मात्र टिकाऊ नसलेली छत्री विकत घेऊ नका. प्लॅस्टिकच्या तारा असलेली छत्री विकत घेऊ नका.
  • छत्री वापरल्यानंतर ती लगेच घडी घालून ठेऊ नका. छत्री उघडून ती सुकण्यासाठी ठेवावी. छत्री पूर्णपणे सुकल्यानंतरच  ती बंद करावी. ओली छत्री बंद केल्यास तिच्या काड्या गंजतात किंवा कापड खराब होते. त्यामुळे छत्री बंद करण्यापूर्वी सुकवणे गरजेचे आहे.
  • जोरदार वारे वाहत असतील तर छत्री शक्यतो वाऱ्याच्या दिशेलाच ठेवावी. कारण विरुद्ध दिशेला छत्री असल्यास ती उलटी होते आणि तिच्या काड्या तुटल्या जातात. काही वेळा कापडही तारांपासून वेगळे होते. छत्रीची तार तुटली असेल तर किंवा तार कापडापासून वेगळी झाली असेल तर ती दुरुस्त करून घ्या. छत्री दुरुस्त करण्यास विलंब झाला तर ती पुढे जाऊन निरुपयोगी होऊ शकते.
  • छत्री नेहमी हळूच उघडावी. झटकन छत्री उघडल्यास तिची तार तुटण्याची शक्यता असते.
  • छत्रीचा वापर हा केवळ पाऊस आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठीच करा. चालण्यासाठी काठी किंवा इतर उपयोगसाठी तिचा वापर करू नका.
  • छत्रीच्या काड्यांमध्ये आणि हँडलजवळ खोबरेल तेल लावावे. असे केल्याने छत्रीच्या काड्या आणि बाकी भाग यांचे गंज लागण्यापासून संरक्षण करता येते.
  • छत्री उघडत असताना त्याच्या बटणावर अधिक जोर देऊ नका अन्यथा बटण बिघडण्याची शक्यता असते.

 

हे ही वाचा :

जुलै महिन्यात इतक्या दिवस बँका राहणार बंद ; RBI ने केली जाहीर बँकांच्या सुट्ट्यांची यादी

जाहिरात फलकाच्या कायद्यांत सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करणार- Uday Samant

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss