spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो ? तर हि बातमी खास तुमच्यासाठी…

अनेक लोकांना कामामुळे पहाटे लवकर उठावे लागतेच मात्र आदल्या दिवशीची धावपळ किंवा कामाच्या गडबडीत थकल्याने दुसऱ्या दिवशी ठरवूनही लवकर उठता येत नाही.

अनेक लोकांना कामामुळे पहाटे लवकर उठावे लागतेच मात्र आदल्या दिवशीची धावपळ किंवा कामाच्या गडबडीत थकल्याने दुसऱ्या दिवशी ठरवूनही लवकर उठता येत नाही. तसेच अनेकांना पहाटे लवकर उठणं आवडडत नाही किंवा त्यांना ते जमत नाही. यशस्वी व्हायचं असेल तर सकाळी लवकर उठयलाच हवं असं आपण अनेक ठिकाणी वाचलं असेल, अनेकांकडून ऐकलं असेल. मात्र रात्री सहज सोपी वाटणारी गोष्ट सकाळी तितकीच कठीण वाटते. मग अलार्म वर अलार्म वाजत राहतो आणि आम्ही बंद करून परत झोपतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठण्याच्या सोप्या आणि जबरदस्त टिप्स देणार आहोत.

सकाळी उठल्यावर आपले जीवन खूप सोपे होते. यामुळे वेळेचे योग्य व्यवस्थापन देखील होते. तसेच निरोग्य आयुष्य आणि चांगल्या जीवनशैलीसाठी सकाळी लवकरण उठणे केव्हाही चांगलेच आहे. म्हणून तर डॉक्टर देखील आपल्याला सकाळी लवकर उठण्याचा सल्ला देतात आणि व्यायाम, योगा किंवा ध्यान करण्याचे सल्ले देतात.दुसरीकडे, जर आपण उशिरा उठलो, तर आपल्याला आरोग्यावर याचा परिणाम होतो. शिवाय आपल्या कामावर देखील याचा परिणाम होतो. त्यामुळे नेहमी सकाळी लवकर उठा. असे सल्ले देखील दिले जातात परंतु, कितीही प्रयत्न केला तरी सकाळी लवकर उठता येत नाही, तर अशा लोकांसाठी काही मार्ग घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठू शकाल. चला याबद्दल जाणून घेऊ या.

  • बहुतेक लोकांची सर्वात मोठी समस्या ही, असते की दररोज सकाळी जेव्हा अलार्म वाजतो, तेव्हा ते फक्त आपल्या डोक्याजवळील फोन किंवा घड्याळ घेऊन त्याला बंद करतात आणि पुन्हा झोपी जातात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमचे घड्याळ किंवा फोन नेहमी बेडपासून दूर ठेवा.
  • अलार्म बंद करताच लगेच खोली सोडा आणि मोकळ्या जागी उभे राहा. असे केल्याने तुमच्या शरीराला ताजी हवा मिळेल आणि तुमच्या डोळ्यांवरी झोप निघून जाईल.
  • ऑफिसमध्ये आपण पूर्णवेळ लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर घालवतो. त्यानंतर घरी आल्यावर मोबाईल वापरतो. यामुळे तुमचे डोळे थकतात. झोपण्याआधी २ तास आपला मोबाईल डोळ्यांपासून दुर ठेवा. दिवसभर आपण लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीनसमोर असल्यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येतो. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं असेल तर मोबाईल दूर ठेवायलाच हवा. मोबाईल वाजत राहील आणि तुमची झोप होणार नाही.
  • तुमची झोपायची आणि उठायची वेळ निश्चित असेल तर तुमच्या शरीराला त्याची सवय होते. यामुळे तुम्हाला रात्री ठरलेल्या वेळी झोप आणि सकाळी ठरलेल्या वेळी जाग येण्यास मदत होते. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून उठू नका, झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. रात्रीची झोप ७-८ तास पुर्ण झाली पाहिजे याची काळजी घ्या.
  • रात्री झोप येत नसेल तर तुम्ही मेडीटेशन आणि हीलिंग गाणी ऐकू शकतात. याचा फायदा तुम्हाला चांगली झोप येण्यास नक्की होईल. याने दुसऱ्या दिवशी तुमची सकाळ आनंदी होईल. रात्री निवांत झोप लागेल याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही झोपताना कोणत्याही प्रकारचा ताण न घेता झोपाल यावर लक्ष द्या.

हे ही वाचा : 

Video : नवरात्र निमित्त दादरमध्ये स्वस्त दरात मस्त साड्या किंमत ५००/- रुपये पासून सुरुवात

महिलांसाठी उपयोगी असलेले काही खास योगासने

उपवासाठी टेस्टी डोसा खास तुमच्यासाठी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss