spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

किचन मधील Wooden utensils स्वच्छ करण्यासाठी, ‘या’ टिप्सचा वापर करा

Kitchen Tips : नियमितपणे स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीलाच स्वयंपाकघरातील भांडी स्वच्छ आणि संभाळून ठेवणे हे किती कठीण जाते, हे त्या व्यक्तीलाच माहित असते. अस्वच्छ भांड्यात अन्न शिजवल्यास शरीराला हानिकारक परिणाम होतात. हे परिणाम टाळण्यासाठी स्वच्छ भांडयात अन्न शिजवणे गरजेचे असते. स्वयंपाकघरातील भांड्यांबद्दल बोलायचे झाले तर चॉपिंग बोर्ड , चमचे, वाट्या या वस्तू स्वयंपाकघरातील महत्वाची भांडी असतात. आणि त्या भांड्याचा वारंवार वापर देखील करण्यात येतो. या भांड्यावर सहजपणे घाण साचण्याची शक्यता असू शकते. लाडकाच्या भांडयात (Wooden utensils) जेवण केल्याने तेल पूर्णपणे शोषून घेतले जाते त्यामुळे लाकडाची भांडी स्वच्छ करण्यास कठीण जाते. भांड्यांपासून दुर्गंधी येणे किंवा भांड्यांवर घाण बसणे हे कोणालाच आवडत नाही. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून काही टिप्स सांगणार आहोत जे लाकडाची भांडी (Wooden utensils) स्वच्छ करण्यास मदत होईल.

लाकडाची भांडी (Wooden utensils) स्वच्छ करण्यासाठी बहुतेक लोक साबणाचा वापर करतात. पण लाकडाच्या भांड्याना साबणाचा वापर केल्याने भांडी स्वच्छ होत नाही. भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साबणाऐवजी मिठाचा देखील वापर करू शकता. त्यासाठी गरम पाण्यात मीठ घालून घ्या आणि मीठ घातल्यानंतर त्यामध्ये भांडी घालून घ्या. किमान थोडा वेळ तरी भांडी गरम पाण्यात असू द्या. थोडा वेळ झाल्यानंतर भांडी पाण्यातून काढून घ्या आणि उन्हात सुकून घ्या. असे केल्याने भांडी स्वच्छ होण्यास मदत होईल.

 

भांड्यातील दुर्गंधी जाण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. तसेच लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असते जे भांडयातील चिकटपणा कमी करण्यास मदत करते. दुर्गंधी कमी करण्यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून घ्या आणि १० मिनटे तरी भांडी धुवून घ्या. असे केल्याने भांड्यातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.

लाकडी भांड्यावरील चिकटपणा जाण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता, लाकडी भांडीवरील चिकटपणा जाण्यासाठी पाणी आणि वाईट व्हिनेगरचे प्रमाण सामान घेणे. आणि वापरणे असे केल्याने भांड्यातील चिकटपणा जाण्यास मदत होते. तसेच तुम्ही लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा (Lemon juice, or baking soda) याचा देवगिल वापर करू शकता.

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss