spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उन्हाळ्यात होतोय सनबर्नचा त्रास मग ”या” फळाचे नक्की सेवन करा

उन्हाळ्यात त्वचा आणि शरीर हायड्रेट राहण्यासाठी अनेक फळाचे किंवा फळांच्या रसाचे सेवन करत असतो. नेहमीच्या आहारात फळांचे आणि भाज्यांचे सेवन करणे गरजेचे आहे. सुंदर दिसण्यासाठी फळांचे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे. त्याचबरोबर त्वचा सुंदर दिसण्यासाठी अनेक ब्युटी प्रॉडक्ट बाजारात मिळतात. फळांचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये द्राक्ष हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. द्राक्षामध्ये व्हिटॅमिन के, अँटीऑक्सीडंट आणि ई जीवनसत्व द्राक्षामध्ये असतात. त्यामुळे आरोग्याला खूप चांगले फायदे होतात. हे घटक त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्वचेला द्राक्षाचा लेप किंवा पेस्ट लावल्यास त्वचेला चांगली चमक येते.

  • चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील तर एका घरच्या घरी एक लेप तयार करा. एक पिकलेले टोमॅटो घ्या नंतर त्यामध्ये ४ ते ५ द्राक्ष कुस्करून घ्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. चेहऱ्यावर तो लेप लावावा. १५ ते २० मिनिटे लेप चांगला सुकल्यावर चेहरा चांगला थंड पाण्याने धुऊन घ्या. त्यामुळे चेहऱ्यावर डाग आणि सुरकुत्या दिसणार नाहीत.
  • चेहऱ्यावर डाग असतील आणि काही केल्या जात नसतील तर नियमित द्राक्षांचे सेवन करा. लाल द्राक्ष खाल्याने ताण कमी होतो. पेशींचे रक्षण होते. त्यामुळे त्वचेला कोणताही रोग होत नाही.
  • चेहरा चांगला उजळण्यासाठी द्राक्ष नियमित खाणे गरजेचे आहे. द्राक्षामध्ये विटामिन इ असते. त्यामुळे चेहऱ्यावर चांगली चमक येते.
  • सध्या सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे अनेक महिलांना सनबर्नचा त्रास होतो. त्यामुळे सूर्याच्या किरणापासून त्वचेला त्रास होऊ शकतो त्यामुळे हिरव्या आणि लाल द्राक्षांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. द्राक्षामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते.

हे ही वाचा:

AC शिवायही खोली राहील थंड, पण कशी?

Katrina kaif प्रेग्नेंट? पण कोणामुळे?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss