spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

स्वयंपाक घरातील ‘बेसन’चा वापर करा आणि तुमचा चेहरा बनवा अधिक चमकदार

जुन्या काळापासून फेसवॉशचा ट्रेंड नसतानाही स्त्रिया चेहरा स्वच्छ करण्यासाठी बेसनाचे विविध प्रकारचे फेस पॅक वापरत असत.

जुन्या काळापासून फेसवॉशचा ट्रेंड नसतानाही स्त्रिया चेहरा स्वच्छ करण्यासाठी बेसनाचे विविध प्रकारचे फेस पॅक वापरत असत. बेसनाचे पीठ चेहऱ्यावर लावण्याचे इतके फायदे आहेत की सर्व महागडे फेसवॉशही त्यासमोर फेल होतात. चेहऱ्याच्या कोणत्याही समस्येसाठी बेसन कसे वापरावे ते जाणून घ्या

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर गोरेपणा आणायचा असेल तर बेसनाचा हा फेस पॅक १ आठवडा नक्क वापर. यासाठी बेसन, १ चिमूट हळद आणि कच्चे दूध एका छोट्या वाटीत मिसळून पातळ पेस्ट बनवा. हा पॅक सुमारे १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि हलके चोळून स्वच्छ करा. ८-१० दिवसात तुमचा चेहरा गोरा होण्यास सुरुवात होईल, परंतु हा पॅक वापरताना कधीही साबण किंवा फेसवॉश वापरू नका.

चेहऱ्याच्या केसांसाठी स्क्रब करा –

१ टेबलस्पून बेसनामध्ये कच्चे दूध किंवा दही आणि अर्धा चमचा गहू जाडसर वाटून घ्या आणि सर्व मिश्रण मिक्स करा. हा स्क्रब केसांच्या विरुद्ध दिशेला अगदी हलक्या हातांनी घासून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील केस हळूहळू पूर्णपणे स्वच्छ होतील आणि चेहरा स्वच्छ होईल.

बेसनाचे काय फायदे आहेत?

  • बेसन नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते, जे चेहऱ्यावर किंवा कोणत्याही भागावर लावल्यास त्वचेतील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा चमकदार होते.
  • बेसन आणि हळदीचा फेस पॅक गोरा आणण्यासाठी सर्वात विश्वासार्ह आणि प्रभावी पॅक आहे. याच्या सततच्या वापराने चेहरा स्वच्छ होतो.
  • बेसन टॅनिंग विरोधी आहे, ज्याचा वापर केल्याने चेहरा, गुडघे, मान आणि हातावरील काळेपणा दूर होतो आणि त्वचा एकसारखी दिसते.
  • बेसन आणि हळद यांचे उबटन नैसर्गिक मेणाचे काम करते. ही पेस्ट सतत काही दिवस केल्याने केस स्वच्छ होतात.
  • सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसनाचे पीठ दूध, दही, मध, कोरफडीचे जेलमध्ये मिसळून लावा, त्याचा फक्त फायदा होतो आणि कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

Latest Posts

Don't Miss