स्वयंपाक घरातील ‘बेसन’चा वापर करा आणि तुमचा चेहरा बनवा अधिक चमकदार

जुन्या काळापासून फेसवॉशचा ट्रेंड नसतानाही स्त्रिया चेहरा स्वच्छ करण्यासाठी बेसनाचे विविध प्रकारचे फेस पॅक वापरत असत.

स्वयंपाक घरातील ‘बेसन’चा वापर करा आणि तुमचा चेहरा बनवा अधिक चमकदार

जुन्या काळापासून फेसवॉशचा ट्रेंड नसतानाही स्त्रिया चेहरा स्वच्छ करण्यासाठी बेसनाचे विविध प्रकारचे फेस पॅक वापरत असत. बेसनाचे पीठ चेहऱ्यावर लावण्याचे इतके फायदे आहेत की सर्व महागडे फेसवॉशही त्यासमोर फेल होतात. चेहऱ्याच्या कोणत्याही समस्येसाठी बेसन कसे वापरावे ते जाणून घ्या

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर गोरेपणा आणायचा असेल तर बेसनाचा हा फेस पॅक १ आठवडा नक्क वापर. यासाठी बेसन, १ चिमूट हळद आणि कच्चे दूध एका छोट्या वाटीत मिसळून पातळ पेस्ट बनवा. हा पॅक सुमारे १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि हलके चोळून स्वच्छ करा. ८-१० दिवसात तुमचा चेहरा गोरा होण्यास सुरुवात होईल, परंतु हा पॅक वापरताना कधीही साबण किंवा फेसवॉश वापरू नका.

चेहऱ्याच्या केसांसाठी स्क्रब करा –

१ टेबलस्पून बेसनामध्ये कच्चे दूध किंवा दही आणि अर्धा चमचा गहू जाडसर वाटून घ्या आणि सर्व मिश्रण मिक्स करा. हा स्क्रब केसांच्या विरुद्ध दिशेला अगदी हलक्या हातांनी घासून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील केस हळूहळू पूर्णपणे स्वच्छ होतील आणि चेहरा स्वच्छ होईल.

बेसनाचे काय फायदे आहेत?

Exit mobile version