खोबरेल तेलाचा ‘या’ वस्तूंसोबत वापर करून गायब करा चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे

खोबरेल तेलाचा ‘या’ वस्तूंसोबत वापर करून गायब करा चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे

अनेक महिला पार्लरमधील सौंदर्य प्रसाधनांचा वापर बरेच वेळा करतात. परंतु काही वेळा विपरीत परिणाम दिसून येतात. त्यामुळे तरुणाई आता नैसर्गिक साधनांकडे वळताना पाहायला मिळत आहे. नैसर्गिक साधनांचा वापर करून चेहरा तजेलदार आणि चमकदार ठेवताना दिसते. त्यासाठी अनेक नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर केला जातो. त्याचपैकी आज आपण खोबरेल तेलाचे त्वचेला होणारे फायदे जाणून घेणार आहोत. नैसर्गिक पद्धतीचे खोबरेल तेल (coconut oil)ते त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. खोबरेल तेलाचे कोणतेही विपरीत परिणाम न होता नेहमी फायदाच होईल. खोबरेल तेलामध्ये असलेल्या अँटीऑक्सीडंट्समुळे त्वचेला संरक्षण मिळते. खोबरेल तेलाचे आणखी सकारात्मक परिणाम आपल्याला व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि मध यांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास मिळतील.

व्हिटॅमिन ई कॅप्सूल
खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल टाकून त्वचेसंबंधित समस्या दूर होऊ शकतात. व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटीऑक्सीडंट मानले जाते, जे त्वचेला हानिकारक घटकांपासून दूर करते. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर हायड्रेशन मिळवून देते आणि त्वचा सुधारण्यास मदत करते. तसेच चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हेही नाहीसे होण्यास मदत होते. या उपायाकरिता २-३ थेंब व्हिटॅमिन ई तेल आणि ते १ चमचा खोबरेल तेल एकमेकांमध्ये मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावरील त्वचेला हलक्या हाताने लावून मालिश करा.

मध
खोबरेल तेलासोबत मधाचा वापर चेहऱ्यावर केल्या अतिशय फायदेशीर ठरते. मध हे त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. मधात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा कोमल आणि तजेलदार बनते. तसेच त्वचेला नैसर्गिकरित्या चमक येऊन फ्रेश वाटते. यामुळे पिंपल्स आणि त्वचेच्या समस्यांना आराम मिळतो. हा उपाय करण्याकरिता एक चमचा खोबरेल तेलात एक चमचा मध मिसळा. १० ते १५ मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर ठेवा त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन; Navneet Rana यांना अश्रू अनावर

काँग्रेसला गणपती पूजेची चीड, त्यांनी माझ्या पूजेलाही विरोध केला: PM Narendra Modi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version