spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चहाच्या उरलेल्या चोथ्याचा असा करा उपयोग, डाग होतील गायब

बरेचदा ही डार्क सर्कल (Dark circle)आपले सौंदर्य कमी करतात, यामुळे आपला चेहरा, डोळे फ्रेश न दिसता आपण थकलेले, आजारी किंवा निराश आहोत असे दिसू लागते. डार्क सर्कल येण्यामागे ताणतणाव, अपुरी झोप, पोषण न होणे अशी अनेक कारणे असतात यामुळे बऱ्याच जणांचा आत्मविश्वास कमी होतो म्हणून हे घालवण्यासाठी आपण काही ना

बरेचदा ही डार्क सर्कल (Dark circle)आपले सौंदर्य कमी करतात, यामुळे आपला चेहरा, डोळे फ्रेश न दिसता आपण थकलेले, आजारी किंवा निराश आहोत असे दिसू लागते. डार्क सर्कल येण्यामागे ताणतणाव, अपुरी झोप, पोषण न होणे अशी अनेक कारणे असतात यामुळे बऱ्याच जणांचा आत्मविश्वास कमी होतो म्हणून हे घालवण्यासाठी आपण काही ना काही उपाय करायला हवे . बऱ्याच गृहिणी मेकअप करून डार्क सर्कल घालवतात पमी,मेकअप करुन ही डार्क सर्कल घालवण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन डार्क सर्कल वर उपाययोजना केलेल्या केव्हाही उत्तम. तुम्हाला माहित नसेल पण चहाच्या चोथ्याचा ही डार्क सर्कल घालवण्यासाठी फायदेशीर असतात ते कसे हे आपण बघुयात.

  • चहा पावडरचा चोथा (pinch of tea powder) फेकून न देता जी क्रीम तुम्ही अंडर आय साठी वापरता त्या मध्ये मिसळा. हे मिश्रण रात्री झोपताना डोळ्यांना लावावे, यामुळे आपल्या डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होईल आणि डार्क सर्कल पासूनही आपली सुटका होईल.
  • वापरलेल्या चहा पावडरचा चोथा उन्हात वाळण्यास ठेवून द्यावा. त्यानंतर चोथा पूर्णपणे सुकल्यानंतर यामध्ये १ चमचा मध( honey ) मिसळून हे मिश्रण डोळ्यांखाली लावावे. काही तासाने हे मिश्रण वाळेल, त्यानंतर डोळे पाण्याने स्वच्छ धुवून टाकावेत.
  • चहा पावडर ही नैसर्गिक रित्या एक अँटीऑक्सिडंट (Antioxidant)आहे, त्यामुळे त्वचेच्या समस्यांसाठी ती लाभकारक ठरते. यामध्ये असणारे कॅफीन(caffeine)आणि अँटीऑक्सिडंटस त्वचा आरोग्यदायी आणि वयापेक्षा लहान ठेवण्यास मदत करतात.

  • चहा पावडरमध्ये अँटी एजिंग(Anti aging), अँटी इन्फ्लमेटरी (Anti-inflammatory)हे गुणधर्म असतात.चहा पावडरचे हे गुणधर्म त्वचेतील मृतपेशी काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे चहा पावडरचा स्क्रब लावावा यामुळे डार्क सर्कल निघून जाण्यास मदत होते.

हे ही वाचा : 

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच अडकणार लग्नबंधनात

स्टीव्ह स्मिथ भारतीय संघासाठी धोक्याची घंटा, आर अश्विन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss