थंडीच्या दिवसात पायांची काळजी घेण्यासाठी ‘या’ Super Homefood चा करा वापर

थंडीच्या दिवसात पायांची काळजी घेण्यासाठी ‘या’ Super Homefood चा करा वापर

Super Homefood : थंडी चालू झाली की शरीराबरोबर पायांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. पण थंडीचे दिवस अनेक आजारांच्या समस्या घेऊन येतात. थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडायला सुरुवात होती. थंडीच्या दिवसात चेहऱ्याची त्वचा, ओठ, आणि हातापायांची त्वचा देखील कोरडी होते. ही समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो तरीही देखील कोरड्या त्वचेपासून सुटका मिळत नाही. पण तुम्ही कोरड्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरातील काही वस्तूंचा वापर करू शकता.

थंडीमध्ये पायांची Dry skin होणे, Crack Hills अश्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या मॉयश्चरायझरचा वापर केला जातो. पण याचा परिणाम काही दिवसांसाठी असतो. त्यानंतर आपले परत पाय आधी सारखे दिसून येतात. आपण त्वचे प्रमाणे पायांना देखील स्क्रॅबिंग करू शकतो. फुट स्क्रबमुळे पायांचा आणि त्वचेचा डेडस्क्रीन जाण्यास मदत होते, तर आज आम्ही तुम्हाला काही स्क्रब सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पायांची स्किन मुलायम होण्यास मदत होतील.

हिवाळ्यात पायांना भेगा पडल्यास बोरिक पावडर, जैतून तेल व्हॅसलिन या गोष्टी एकत्र करून घेणे आणि पायांना भेगा पडल्या त्या ठिकाणी लावणे. असे केल्यास पायांना त्रास होत नाही आणि भेगा देखील कमी होण्यास मदत होते. किंवा तुम्ही हळदी मध्ये कोमट तेल मिक्स करून देखील त्या ठिकाणी लावून घेणे.

 

Milk scrub :

साहित्य :

१ कप दूध
५ कप कोमट पाणी
४ टेबलस्पून साखर किंवा मीठ
१/२ कप बेबी ऑइल
प्युबिक स्टोन

कृती :

एका मोठ्या भांडयात एक कप दूध, ५ कप कोमट पाणी घेणे
नंतर त्या पाणी मध्ये पाय घालून बसा किमान १० मिनिटे तरी बसा
नंतर बाऊल मध्ये बेबी ऑईल , साखर किंवा मीठ एकजीव करून घ्या
आणि पेस्ट तयार करून घ्या, पेस्ट तयार झाल्यानंतर पायांना स्क्रब करून घ्या.
स्क्रब केल्यानंतर पायांना पेट्रोलियम जेली लावून घ्या.
पण कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचा आहे.

 

हे ही वाचा : थंडीच्या दिवसात मुलांना द्या ‘हे’ पदार्थ….

 

Exit mobile version